Shani Dev : न्याय देवता शनि हा प्रत्येकाला कर्मानुसार फळ देतो. ज्याचे कर्म चांगले त्याच्यावर शनिची कृपा असते आणि ज्याचे कर्म चांगले नाही, त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो. शनिच्या राशी परिवर्तनाचा परिणाम सुद्धा राशी चक्रातील सर्व राशींवर पडतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, जर कोणत्या व्यक्तीवर शनिची विशेष कृपा असेल तर त्याच्या आयुष्यातील प्रत्येक कष्ट व दु:ख दूर होतात आणि सुख समृद्धी लाभते. शनि एकमेव असा ग्रह आहे ज्याचा अशुभ प्रभाव लोकांच्या जीवनावर आयुष्यात एकदा तरी दिसून येतो.
सध्या शनि त्याची मूळ रास त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये विराजमान आहे आणि मार्च २०२५ पर्यंत शनि कुंभ राशीमध्ये विराजमान राहणार आहे. त्यानंतर शनि मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शनिने मीन राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर काही राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल. शनिने मीन राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर कोणत्या राशींना लाभ मिळणार, जाणून घेऊ या.
पंचाग नुसार शनि २९ मार्च रात्री ११ वाजून १ मिनिटांनी मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि ३ जून २०२७ पर्यंत या राशीमध्ये विराजमान राहणार आहे.
मिथुन राशी (Mithun Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी शनिचे मीन राशीमध्ये प्रवेश करणे लाभदायक ठरू शकते. या राशीच्या आठव्या आणि नवव्या भावाचे स्वामी शनि आहे आणि ते दहाव्या भावात प्रवेश करणार. त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. कुटुंबाबरोबर हे लोक चांगला वेळ घालवतील. या लोकांचे कुटुंबातील इतर सदस्यांबरोबरचे वादविवाद समाप्त होतील. यांचे आजारपण दूर होईल. त्याबरोबर मानसिक तणावापासून मुक्ती मिळेल. अडकलेली कामे मार्गी लागतील आणि धन संपत्तीत वाढ होईल. करिअरच्या क्षेत्रात खूप प्रगती होईल. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. जर तुमच्या कुंडली मध्ये शनिबरोबर बुधची स्थिती उत्तम असेल तर या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते.
हेही वाचा : दिवाळीनंतर गुरु ग्रह करणार चंद्राच्या नक्षत्रात प्रवेश! राजासारखे जीवन जगतील ‘या’ राशींचे लोक
सिंह राशी (Leo Zodiac)
सिंह राशीच्या लोकांसाठी शनिचे मीन राशीमध्ये जाणे फायद्याचे ठरू शकते. या राशीच्या लोकांच्या जीवनातील समस्या दूर होतील. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. तसेच त्यांना आनंदाची वार्ता मिळेल. या लोकांचा आत्मविश्वास अचानक वाढेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. या काळात यांना कुटुंबाचे चांगले सहकार्य लाभेल
कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी वाढू शकते. करिअर क्षेत्रात मोठा लाभ मिळू शकतो. नवीन नोकरी शोधणाऱ्या लोकांना भरपूर यश मिळू शकते. या काळात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना चांगला रिर्टन मिळू शकतो. नवी नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना भरपूर यश मिळू शकते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)