ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीत पंचग्रही योग तयार झाला आहे. पाच ग्रह एकत्रितपणे मकर राशीत आल्याने त्याचा परिणाम होईल असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. देशात पाच राज्यांचा निवडणुका असून निकाल १० मार्च रोजी लागणार आहे. त्यामुळे देशाची दशा आणि दिशा बदलण्यात हा योग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यापूर्वी १९६२ आठ ग्रह म्हणजेच अष्टग्रही योग बनला होता आणि तेव्हा चीनने भारतावर हल्ला केला होता. जेव्हा जेव्हा काही ग्रह विशिष्ट राशीमध्ये एकत्र येतात तेव्हा देश, कालखंडानुसार काही बदल नक्कीच होतात, असं ज्योतिषशास्त्रानुसार भाकीत मांडलं जातं. सीमेवर वारंवार वाद होतात. या दिवसांत या पंचग्रही योगांमुळे रशिया आणि युक्रेनमधील सीमा विवाद वाढेल. युद्ध १९६२ मध्येही झाले आणि २०२२ मध्येही होत आहे. तेव्हाही एक आंतरराष्ट्रीय मुद्दा होता. ज्योतिषशास्त्र जीवनावर अशा खगोलीय घटनांचे अपेक्षित परिणाम आणि बदलांची चर्चा करते. भारतात निवडणुकांचे अनपेक्षित निकाल लागतील. काही सत्तेत असतील तर काही सत्ता गमावतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२७ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत पंचग्रही योग प्रभावी राहणार असून निवडणुकीचे निकालही लागणार आहे. या दिवसात काल सर्प योग देखील प्रभावी होईल, जो अनपेक्षित घटनांचे लक्षण आहे. जर आपण विस्तृतपणे पाहिले तर मकर राशीत पाच ग्रह एकत्र आल्याने पाच राशीच्या लोकांच्या जीवनात चांगले बदल घडतील. मेष, वृषभ, कर्क, तूळ आणि मकर राशीच्या लोकांना निवडणुकीचा लाभ मिळेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण, नोकरी इत्यादी क्षेत्रात फायदा होईल. व्यापारी आपल्या व्यवसायात प्रगती करतील. स्थावर मालमत्तेशी संबंधित व्यवहार पूर्ण होतील. ज्या लोकांच्या कुंडलीत शुक्र, शनि, बुध, चंद्र आणि मंगळ चांगल्या स्थितीत असतील त्यांच्यासाठी पंचग्रही योग भाग्यदायी ठरेल.

Maha Shivratri 2022: महाशिवरात्रीला ग्रहांचा योगायोग, ‘या’ चार राशींवर असेल भगवान शिवाची विशेष कृपा

२७ फेब्रुवारीपासून मकर राशीत विशेष पंचग्रही योग सुरु झाला आहे. यामध्ये बुध, मंगळ आणि शनि आधीच बसले होते. त्याच दिवशी चंद्रही प्रवेश करेल आणि शुक्रही येईल. त्यामुळे पाच राज्यांच्या निवडणूक निकालांवर या पाच ग्रहांचा परिणाम होणार आहे. निवडणुकीचा निकाल १० मार्चला आहे. शुक्र, मंगळ आणि शनि हे तीन ग्रह मकर राशीत असतील आणि बुध आणि गुरू हे दोन ग्रह कुंभ राशीत असतील. मकर आणि कुंभ राशी शनि ग्रहाच्या अंमलाखाली येतात. ज्यांच्या कुंडलीत शनी उच्च स्थानी किंवा कारक ग्रह आहे, त्यांच्यासाठी निवडणुकीचे निकाल नशीब बदलणारे असतील. ज्यांच्या जन्मपत्रिकेत पूर्ण काल ​​सर्प योग आहे, त्यांचे भाग्यही बदलणार आहे. तुम्हाला जे वाटलं होतं ते घडणार नाही, जे वाटलं नाही ते अचानक घडेल, हे कालसर्प योगाचे आश्चर्य आहे.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology panchgrahi yog in makar rashi impact on election result rmt
Show comments