आठवड्याच्या प्रत्येक दिवसावर एका ग्रहाचे राज्य असते आणि हे संबंधित ग्रह त्या दिवशी जन्मलेल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्या स्वभावाची खोल छाप सोडतात. आठवड्यातील सर्व दिवसांचा जीवनावर खोलवर परिणाम होतो. व्यक्तीचा ज्या दिवशी जन्म होतो त्या दिवसाच्या प्रभावामुळे त्या व्यक्तीचे वर्तन आणि त्याचे चारित्र्यही प्रभावित होते. आज आपण जाणून घेऊया आठवड्याच्या कोणत्या दिवशी जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो.
सोमवारी जन्मलेले लोक बोलण्यात गोड असतात
सोमवारी जन्मलेली व्यक्ती चंद्राच्या प्रभावामुळे बुद्धिमान आणि शांत असते. हे लोक आपल्या गोड बोलण्याने इतर लोकांना सहज मोहित करतात. असे लोक स्थिर स्वभावाचे असतात आणि सुख-दु:खात समान वागतात.
मंगळवारी जन्मलेले लोक कुटुंबाचे नाव रोशन करतात
मंगळवारी जन्मलेले लोक मंगळाच्या प्रभावामुळे जटिल स्वभावाचे असतात, इतरांच्या कामात चुका काढतात, युद्धप्रेमी, पराक्रमी असतात, आपला शब्द पाळतात आणि आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल करतात.
बुधवारी जन्मलेल्या लोकांना अभ्यासात रस असतो
बुध ग्रहाच्या प्रभावामुळे बुधवारी जन्मलेले लोक गोड बोलणारे, अभ्यासात रस घेणारे, जाणकार, लेखक आणि श्रीमंत असतात. ते इतर लोकांवर सहज विश्वास ठेवत नाहीत.
Vastu Tips : खूपच शुभ असतात ‘या’ भेटवस्तू; त्या देणे आणि इतरांकडून मिळणे बदलू शकते आपले नशीब!
गुरुवारी जन्मलेल्या लोकांना मिळतो सन्मान
या दिवशी जन्मलेली व्यक्ती गुरूच्या प्रभावामुळे विद्येत कुशल, धनवान, ज्ञानी, विवेकी आणि उत्तम सल्लागार असते. हे लोक इतरांना उपदेश करण्यात नेहमीच पुढे असतात. त्याचबरोबर त्यांना लोकांकडून मान-सन्मान आणि प्रसिद्धी मिळण्याची तीव्र इच्छा असते.
शुक्रवारी जन्मलेले लोक स्वभावाने चंचल असतात
शुक्रवारी जन्मलेले लोक चंचल स्वभावाचे असतात, भौतिक सुखांमध्ये मग्न असतात, वादविवादामध्ये बुद्धिमान, धनवान आणि शुक्राच्या प्रभावामुळे तीक्ष्ण बुद्धी असलेले असतात. या लोकांचा देवावर विश्वास कमी असतो.
शनिवारी जन्मलेले लोक गंभीर स्वभावाचे असतात
शनिवारी जन्मलेले लोक कठोर स्वभावाचे, पराक्रमी, कष्टाळू, दुःख सहन करण्याची अद्भुत शक्ती असलेले, शनिच्या प्रभावामुळे स्वभावाने न्यायी आणि गंभीर असतात. इतरांची सेवा केल्यामुळे या लोकांना प्रसिद्धीही मिळते.
रविवारी जन्मलेले लोक तेजस्वी आणि गुणवान असतात
रविवारी जन्मलेली व्यक्ती तेजस्वी, हुशार, सदाचारी, उत्साही, दानशूर, पण सूर्याच्या प्रभावामुळे थोडी गर्विष्ठ आणि पित्त स्वभावाची असते. रविवारी जन्मलेल्या लोकांना खूप राग येतो.
‘या’ राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार यश, प्रमोशनचीही शक्यता; जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य
दिवसा जन्मलेले लोक दिसायला आकर्षक असतात
दिवसा जन्मलेली व्यक्ती धार्मिक स्वरूपाची असते. सामाजिक कार्यात भाग घेणारा तो पवित्र आत्मा असतो. त्याला जीवनात सर्व प्रकारच्या भौतिक सुखसोयी मिळाव्यात अशी त्याची इच्छा असते. असे लोक मित्रांमध्ये खूप लोकप्रिय असतात. त्यांची मानसिक आणि बौद्धिक क्षमता उच्च दर्जाची आहे आणि ते दिसायलाही आकर्षक असतात.
रात्री जन्मलेले लोक रोमँटिक स्वभावाचे असतात
रात्री जन्मलेली व्यक्ती कमी बोलणारी असते तसेच, हे लोक रोमँटिक स्वभावाचे असतात. ते हुशार आणि स्वतःचे काम करवून घेण्यात पटाईत असतात. शारीरिक त्रासामुळे त्यांना विनाकारण त्रस्त राहावे लागते.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)