Astrology : ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या कुंडलीमध्ये जन्मापासून ४८ वर्षांपर्यंत ग्रहांचे वयाच्या प्रत्येक वर्षी वेगवेगळा प्रभाव पडतो. आपल्या जीवनावर चंद्र, मंगळ, आणि गुरूनंतर शनिचा विशेष प्रभाव दिसून येतो. जर तुमच्या कुंडलीत शनि एका विशिष्ट घरात विराजमान असेल वयाच्या ३५ व्या वर्षानंतर तुमचे नशीब चमकू शकते. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. पण तुम्हाला माहितीये का त्यासाठी कुंडलीत शनि कोणत्या घरात विराजमान असणे आवश्यक असते? आज आपण त्या विषयी जाणून घेणार आहोत. (Astrology People get money and wealth after 35 years by the grace of Shani)
शनि देवाची कृपा
शनि ग्रहचा परिणाम वयाच्या ३६ ते ४२ वर्षाच्या दरम्यान दिसून येतो. जर शनि उत्तम असेल तर व्यक्तीला घर, व्यवसाय आणि राजकारणात लाभ मिळू शकतो पण शनि अशुभ असेल तर त्याचा दुष्परिणाम सुद्धा दिसून येतो. ज्योतिषशास्त्राच्या मते, वयाच्या ३४ वर्षांपासून ३६ वर्षांपर्यंत बुध ग्रहाचा प्रभाव दिसून येईल. बुध ग्रहाचा संबंध हा थेट व्यवसाय आणि नोकरीबरोबर असतो.
कुंडलीत शनि कोणत्या घरात विराजमान असणे आवश्यक असते?
जर व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनि अष्टम म्हणजेच आठव्या स्थानी विराजमान आहे तर त्या लोकांना आयुष्यात भरपूर यश मिळेन. असं म्हणतात, या स्थानी शनि असल्यामुळे जीवनात या लोकांना कितीही दु:ख मिळाले तरी वयाच्या ३५ व्या वर्षानंतर या लोकांचे नशीब चमकू शकते. या लोकांना मोठा धनलाभ मिळू शकतो.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील आठवे घर वारसा दर्शवते. आठवे घर संशोधन, गूढ विज्ञान, खजिना, खाण, कोळसा, लॉटरी, रहस्य, तंत्र आणि आध्यात्मिक गोष्टींचे प्रतिनिधित्व करते.