ज्योतिषशास्त्रानुसार १२ राशींचे वर्णन केले आहे. या १२ राशींच्या लोकांचे गुण आणि स्वभाव वेगवेगळे असतात. तसेच त्यांच्या आवडी-निवडीही एकमेकांपेक्षा वेगळ्या असतात. आज आपण अशा राशींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचे लोक खूप भावूक असतात आणि लोक त्यांच्या भावनिकतेचा फायदा घेतात. चला जाणून घेऊया या चार राशी कोणत्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष (Aries)

या राशीचे लोक प्रत्येक गोष्टीवर भावनिक होतात. ते कशामुळे भावूक होतात याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. हे लोक केवळ त्यांच्या त्रासातच नव्हे तर इतरांना दुःखी पाहून खूप भावूक होतात, या राशीच्या लोक दुसऱ्यांचे दु:ख कधीच पाहू शकत नाहीत. आपल्या प्रियजनांवर काही संकट आले तर ते अस्वस्थ होतात आणि ते रडायला लागले तर अश्रू रोखणे कठीण होते.

(हे ही वाचा: ‘या’ ३ राशीचे लोक असतात मल्टी टास्कर्स आणि प्रतिभावान; बघा तुमची राशी यात आहे का)

कर्क (Cancer)

या राशीचे लोकही खूप भावूक असतात. लोकही त्यांच्या कमकुवतपणाचा फायदा घेतात. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, त्यामुळे तो त्यांना भावूक करतो. तसेच या राशीचा स्वभाव नारळासारखा आहे, जो बाहेरून कडक दिसत असला तरी आतून खूप मऊ असतो. ते ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी ते काहीही करण्यास तयार असतात, परंतु जर त्यांना एखाद्याबद्दल वाईट वाटले तर ते लगेच सर्वकाही संपवण्यास तयार असतात. त्यांच्यासाठी नातेसंबंध खूप अर्थपूर्ण आहेत.

(हे ही वाचा: Astrology : शनिदेवाच्या प्रभावामुळे ‘या’ २ राशीच्या लोकांच्या आयुष्यात नसते पैशाची कमतरता, ते धन कमाईत असतात सर्वात पुढे!)

कन्या (Virgo)

या राशीचे लोक खूप भावूकही असतात पण ते त्यांच्या भावना चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकत नाहीत. अगदी लहानसहान गोष्टीही ते मनावर घेतात आणि त्याबद्दल विचार करून बराच वेळ अस्वस्थ होत राहतात. कन्या राशीवर बुध ग्रहाचे राज्य असते, जे त्यांना भावनिक बनवते. या राशीचे लोक कोणाच्या तरी छोट्या-छोट्या गोष्टींवर मन लावून बसतात आणि त्यांच्याबद्दल विचार करून पुन्हा पुन्हा अस्वस्थ होतात.

(हे ही वाचा: ‘या’ ४ राशीच्या लोकांना कमी वयातच मिळते प्रसिद्धी आणि संपत्ती, पहा तुमचाही समावेश आहे का या यादीत)

मीन (Pisces)

या राशीचे लोक खूप भावूक असतात. जर त्यांनी एकदा कोणाशी नातं तयार केलं तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न तर करतातच पण समोरच्या व्यक्तीकडून खूप अपेक्षाही ठेवतात. मीन राशीवर बृहस्पति ग्रहाचे राज्य आहे, ज्यामुळे ते भावनाप्रधान बनतात.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology people of these 4 zodiac signs are very emotional often their advantage is taken ttg