Mulank 4 : तुम्ही कधी कोणाला अचानक एका रात्रीमध्ये लोकप्रिय झालेले पाहिलेले आहे का? असं राहु ग्रहामुळे होते. ज्योतिषशास्त्रामध्ये छाया ग्रह किंवा पापी ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहु ग्रहामुळे असे होते. एका रात्रीत सर्वकाही बदलते. या दोन्ही घटना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही असू शकतात. अंक ज्योतिषशास्त्रानुसार, मूलांक ४ चा स्वामी ग्रह राहु आहे. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ आणि ३१ तारखेला झाला असेल त्याचा मूलांक ४ असतो. (astrology people of these zodiac signs become rich and famous suddenly like Monalisa in kumbh mela)
राहु ग्रहाच्या प्रभावाने मूलांक ४ चे लोक महत्त्वाकांक्षी, आणि तीक्ष्ण बुद्धीचे असतात. मेहनती, संवेदनशील आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता असणारे असते. या कारणाने मीडिया, कायदा, राजकारणात यशस्वी होतात. अमेरिकाचे पूर्व राष्ट्रपती बराक ओबामाचा मूलांक ४ असतो. असे अनेक सर्व सेलिब्रिटिज आहेत, ज्याचा मूलांक ४ आहेत.
राहु ग्रह जीवनात अचानक चढ उतार देणारा ग्रह आहे. या मूलांक ४ च्या लोकांसाठी जीवनात अनेक घटना अशा असतात जो खूप कमी काळात त्यांचे आयुष्य बदलू शकते. ते अचानक यशस्वी होऊ शकतात किंवा मोठे नुकसान होऊ शकतात.
मूलांक ४ असलेल्या लोकांना जीवनात खूप धोका मिळतो. विशेष करून या लोकांची नात्यात खूप फसवणूक होते. या मूलांकचे लोक अधिक संवेदनशील असतात ज्यामुळे ते शंका करणाऱ्या स्वभावाचे असतात आणि स्वत:चे आयुष्य स्वत: बिघडतात. ते कधी इतरांवर विश्वास ठेवू शकत नाही.
मूलांक ४ असलेले लोक कोणताही धोका पत्करण्यास घाबरत नाही आणि खूप घाईत निर्णय घेतात. त्यामुळे ते सर्व संधीचा लाभ मिळवू शकतात, जे सहसा कोणाला दिसत नाही. याच कारणाने ते एका झटक्यात श्रीमंत बनवू शकतात. ते अडचणीमध्ये असले तरी घाबरत नाही ते पुन्हा नव्या गोष्टी मिळवतात आणि आयुष्यात नवी उंची गाठतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)