ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव त्याच्या ग्रह, नक्षत्र आणि राशीशी संबंधित असतो. प्रत्येक राशीचे गुण शास्त्रात सांगितले आहेत. हेच कारण आहे की प्रत्येक राशीची स्वतःची खास गुणवत्ता असते. एखाद्याच्या राशीच्या कुंडलीत असलेले ग्रह कमकुवत आणि अशुभ असतात तेव्हा राग आणि अहंकार वाढतो. ही गोष्ट या राशीच्या मुलींमध्ये जास्त दिसते. जाणून घ्या त्या राशींबद्दल ज्यांना अतिशय रागीट स्वभावाचे मानले जाते.
सिंह (Leo)
सिंह राशीच्या लोकांना राग येतो तेव्हा त्यांचा संयम सुटतो. रागाच्या भरात ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. म्हणूनच तुम्ही त्यांच्याशी वाद करण्यापूर्वी विचार केला पाहिजे. त्यांना शांत करणे खूप कठीण असते.
(हे ही वाचा: मीन राशीतील ग्रहांचा राजा सूर्य बदलणार आहे राशी, ‘या’ राशींना होणार फायदा)
मेष (Aries)
या राशीचे लोक खूप साहसी आणि उत्साही असतात परंतु त्यांना लहानसहान गोष्टीचेही वाईट वाटते. रागाच्या भरात त्यांचा बोलण्यावर ताबा राहत नाही आणि ते समोरच्या व्यक्तीला खूप चांगले-वाईट बोलतात. त्यांना खूप लवकर राग येतो.
(हे ही वाचा: ‘या’ ३ राशीचे लोक समोरच्यावर नेहमीच घेतात खूप संशय, जोडीदाराच्या प्रत्येक हालचालीवर ठेवातात लक्ष)
कर्क (Cancer)
या राशीच्या लोकांना खूप लवकर राग येतो. ते खूप भावनिक असतात. त्यांना छोट्याशा गोष्टीचेही वाईट वाटते. रागाच्या भरात ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि समोरच्या व्यक्तीसोबतचे नातेही तोडू शकतात.
(हे ही वाचा: Shani Gochar: ३० वर्षांनंतर शनिदेव कुंभ राशीत करतील प्रवेश, ‘या’ राशींवर सुरू होईल साडेसातीचा प्रभाव)
वृश्चिक (Scorpio)
या राशीचे लोक खूप रागीट स्वभावाचे असतात. त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगायला आवडते. त्यांच्यावर कोणी वर्चस्व गाजवते हे त्यांना आवडत नाही. समोरच्या व्यक्तीने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही तर त्यांना खूप राग येतो. ते रागात काहीही बोलतात.
मकर (Capricorn)
या राशीचे लोक खूप बुद्धिमान असतात. ते प्रत्येक गोष्टीत शहाणपण दाखवतात. त्यांना राग पटकन येत नसला तरी जेव्हा येतो तेव्हा खूप लवकर येतो. ते समोरच्या व्यक्तीला इतकं चांगलं-वाईट सांगते की त्यांचं नातं तुटण्याची शक्यता असते.
(हे ही वाचा: Shani Dev: ३० वर्षांनंतर कुंभ राशीत शनि करेल प्रवेश, ‘या’ राशीच्या लोकांना मिळेल साडेसातीपासून मुक्ती)
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)