Personality by Zodiac signs : आचार्य चाणक्य सांगतात की, स्वत: सर्व चूका करुन शिकण्यासाठी आयुष्य खूप छोटे आहे, त्यापेक्षा दुसऱ्यांच्या चूकांमधून शिकावे आणि यशस्वी व्हावे. श्रीमंत आणि यशस्वी लोक फक्त आपल्या चूकांमधून शिकत नाही तर दुसऱ्यांच्या चूकांमधूनही शिकतात जेणेकरून आपले नुकसान होऊ नये. पण ज्योतिषशास्त्रानुसार काही राशी अशा आहेत ज्यांचे जातक एकानंतर एक चूका करत राहातात आणि त्यातून योग्य शिकवण घेत नाही. त्यामुळे ते लोक आपल्या हाताने स्वत:चे नुकसान करून घेतात. असे म्हणू शकता की, या लोकांना शत्रूची आवश्यकता नसते तर कित्येक वेळा हे लोक स्वत:चे शत्रू ठरतात. या लोकांना वेळीच सावध व्हायला पाहिजे.
स्वत:चे शत्रू होतात या राशीचे लोक
मेष (Aries):
ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीचे जातक काम करताना किंवा बोलण्याआधी विचार करत नाही त्यामुळे ते संकटात सापडतात. एवढेचं नव्हे तर गडबड झाल्यानंतरही सावरण्याऐवजी हे काही झालेच नाही असे वागतात असे मानले जाते. असे म्हणतात की हे लोक आयुष्यात कित्येक वेळा त्याच त्याच चूका करतात आणि त्यामुळे त्यांचे नुकसान होते.
मिथुन (Gemini) :
ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीचे लोक अनेकदा द्विधा मनस्थितीत राहतात, त्यामुळे ते अनेक गोष्टींमध्ये हात आजमावत राहतात. असे म्हणातात की हे लोक एकाच ठिकाणी राहून काम करत नाहीत आणि त्यांचे नुकसान करून घेतात. नातेसंबंधांच्या बाबतीतही त्यांचे वर्तन अस्थिर राहते असे मानले जाते.
हेही वाचा – भावनिक होऊन निर्णय घेतात ‘या’ अक्षराचे लोक? कोणतीही गोष्ट सहज मिळवू शकतात!
कर्क (Cancer):
ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीचे जातक तसे तर फार शिस्तप्रिय असतात पण लोकांना ओळखण्यामध्ये चूक करतात आणि मोठे नुकसान करून घेतात. असे म्हणतात की, हे लोक प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवातात, ज्यामुळे कित्येकदा त्यांची फसवणूक होते.
कुंभ (Aquarius):
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीचे जातक साधरणत: हट्टी असतात, कधीही दुसऱ्यांचे ऐकून घेत नाही आणि अशावेळी ज्योतिषशास्त्रानुसार, त्यांच्यासाठी फायदेशीर असलेल्या चांगल्या सल्ल्याकडे देखील दुर्लक्ष करतात. असे म्हणतात, आपल्या अंहकारामुळे हे लोक आपल्याच मनाचे करतात आणि मग स्वत:चे नुकसान करून घेतात.
हेही वाचा – Palmistry: तळहातावर ‘X’ अक्षर असणारे लोक आयुष्यात कमावू शकतात भरपूर पैसा?
मीन (Pisces):
ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीचे जातक तसे चांगले व्यक्ती असतात पण प्रेमाच्याबाबतीत हे लोक गडबड करतात. असे म्हणतात की, प्रेमाच्या बाबतीत हे लोक अशा चूका करतात ज्यामुळे त्यांची लव्ह लाईफ आणि मॅरिड लाइफमध्ये चढ-उतार येत राहतात. हे लोक प्रेमाच्या बाबतीत त्याच्या अव्यवाहारिक वागतात स्वत:चे खूप नुकसान करतात असे मानले जाते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)