ज्योतिषशास्त्रात राहू-केतू या दोन्ही ग्रहांना छाया ग्रहांचा दर्जा देण्यात आला आहे. हे दोन्ही ग्रह आपल्या जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतात. असे मानले जाते की, जर या ग्रहांचे कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत विशेष स्थान असेल तर ते त्याला सकारात्मक फळ देतात. कुंडलीत राहू-केतू बलवान असतील तर व्यक्तीला भरपूर लाभ होतो. या ग्रहांना एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी सुमारे दीड वर्षे लागतात. राहू ग्रह १२ एप्रिल २०२२ रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे, त्यानंतर केतू या दिवशी तूळ राशीत प्रवेश करेल.
मेष: मेष राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप शुभ असणार आहे. या काळात आत्मविश्वास दुणावलेला असेल. करिअर असो वा फिटनेस किंवा व्यक्तिमत्त्व यात बदल दिसून येतील. मात्र वाढत्या आत्मविश्वासासह निर्णय घेण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. या काळात स्वभावात स्वार्थीपणा येण्याची शक्यता आहे. या काळात इतरांकडे दुर्लक्ष करू नका आणि भांडणं देखील टाळा.
वृषभ: या राशीच्या लोकांना संक्रमण काळात बाहेर जाण्याची संधी मिळू शकते. जे लोक परदेशात जाण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा योग्य आणि शुभ काळ आहे. ज्यांना नोकरी व्यवसायात कामाच्या ठिकाणी बदल करायचे आहेत त्यांच्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. आरोग्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. निष्काळजीपणामुळे आरोग्यावर अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. या काळात पौष्टिक आहार आणि पुरेशी झोप घ्या.
मिथुन: या संक्रमणादरम्यान या राशीच्या लोकांना पैसे कमविण्याची चांगली संधी मिळणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये चढ-उतार येऊ शकतात, त्यामुळे तुमच्या जोडीदाराचं म्हणणं ऐका आणि दुर्लक्ष करणे टाळा. या व्यतिरिक्त या कालावधीत तुम्हाला तुमच्या मुलांसोबत काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तुम्ही विद्यार्थी असाल तर या काळात तुमच्या अभ्यासात काही अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्या.
राहू आणि केतूचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी उपाय
- दुर्गा चालिसाचा पाठ करा किंवा “ओम दुर्गाय नमः” चा दिवसातून २७ वेळा जप करा.
- मंगळवारी हनुमान चालिसाचा पाठ करा आणि हनुमानजींना बुंदीचा प्रसाद द्या.
- “ओम केतवे नमः” मंत्राचा जप करा.
- “ओम राहवे नमः” मंत्राचा जप करा.
- भटक्या कुत्र्यांना आणि माशांना खायला द्या.