जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये येतात, तेव्हा या योगास ज्योतिषशास्त्रात कालसर्प दोष म्हणतात. या योगाचे चांगले किंवा वाईट परिणाम हे कुंडलीतील वेगवेगळ्या राशींमध्ये असलेल्या ग्रहांच्या आधारावरच कळतात. अनेक लोकांसाठी काल सर्प योग वरदान ठरतो. ज्योतिषशास्त्रात हा योग शुभ फल देणारा मानला जात नाही. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा दोष असतो त्याला यश खूप उशिरा मिळते. अशा व्यक्तीला प्रत्येक कामात अडथळ्यांचा सामना करावा लागतो. असे म्हणतात की, अशा व्यक्तीला यश येताना दिसताच यश त्याच्यापासून दूर जाऊ लागते. कालसर्प म्हणजे काय आणि हा योग दूर करण्याचे उपाय जाणून घेऊयात
राहु आणि केतू हे कुंडलीत एका बाजूला असतात आणि इतर सर्व ग्रह त्यांच्या मध्ये असतात, तेव्हा काल सर्प योग किंवा दोष तयार होतो. कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्प दोष होण्याचे कारण राहु-केतू आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रह चारी बाजूंनी प्रदक्षिणा घालून बसतात, त्याला मानसिक त्रास, रोग, दोष, जादूटोणा, हाडांचे आजार होतात. या लोकांना यश मिळविण्यात विलंब होतो. काल सर्प योगाचे १२ प्रकार आहेत ज्यांचे वेगवेगळे परिणाम आहेत. या योगामुळे अनेकांच्या जीवनात अडचणी येतात. जर कुंडलीत काल सर्प दोष असेल तर पीडित व्यक्तीने भगवान शिव, राहू-केतू आणि कर्कोटक इत्यादींची पूजा करावी. असे म्हणतात की त्यांची पूजा आणि मंत्रजप केल्याने या दोषाचा प्रभाव कमी होतो. याशिवाय राहू आणि केतू ग्रहांच्या शांतीसाठी उपाय करा. काल सर्प दोष निवारण यंत्राची पूजा करावी. तुम्ही सर्प मंत्र आणि सर्प गायत्री मंत्राचाही जप करू शकता. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही काल सर्प निवारण पूजा देखील करू शकता. ॐ नवकुलाय विद्यमहे विषदंताय धीमहि तन्नो सर्प: प्रचोदयात्। या मंत्राचा जाप केल्याने लाभ मिळतो.
Astrology 2022: तीन राशींसाठी येणारे ४५ दिवस असतील खास; आर्थिक स्थितीत सुधारणा होणार
दुसरीकडे राहू आपल्या कुंडलीत वृषभ किंवा मिथुन राशीत असतो तेव्हा अशा लोकांना राहूच्या दशात खूप यश मिळते. काल सर्प योग असलेल्या व्यक्तीच्या कुंडलीत जेव्हा गुरु आणि चंद्र एकमेकांच्या मध्यभागी असतात किंवा एकत्र बसलेले असतात, तेव्हा अशा व्यक्तीची सतत प्रगती होते.