ज्योतिष शास्त्रात शुक्र ग्रह एक महत्त्वपूर्ण ग्रह आहे. ब्रह्मांडातील ग्रहांच्या स्थितीत जेव्हा जेव्हा बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम मानवावरही होतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राचा संबंध सुख-सुविधांशी सांगितला आहे. यासोबतच शुक्र प्रेम, प्रणय, मनोरंजन, फॅशन, परदेश इत्यादींचा कारक आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा शुक्राच्या हालचालीत बदल होतो तेव्हा त्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. जेव्हा एखादा ग्रह सूर्य ग्रहाजवळ येतो किंवा सूर्याच्या अंशापासून 10 अंशाच्या आसपास येतो, तेव्हा ग्रह अस्त होतो असं ज्योतिषशास्त्रात म्हणतात. पंचांगानुसार ६ जानेवारी २०२२ ते १४ जानेवारी २०२२ पर्यंत शुक्र ग्रह अस्त असेल. १४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ५.२९ वाजता शुक्राची अस्त समाप्त होईल. जेव्हा शुक्र अस्त होतो तेव्हा शुभ कार्ये होत नाहीत. शुक्र ग्रहाचा तुमच्या राशीवर काय परिणाम होतील, जाणून घ्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा