Surya Shani Kendra Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो ज्याचा थेट परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर दिसून येतो. अशात ग्रहांची युती तसेच शुभ अशुभ दृष्टी सुद्धा पडते ज्याचा थेट परिणाम राशिचक्रातील १२ राशींवर दिसून येतो. अशात वर्षाच्या शेवटच्या महिन्यात अनेक ग्रहांची स्थितीमध्ये बदल झाल्यामुळे अनेक राशींवर शुभ अशुभ परिणाम दिसून येत आहे. सूर्य आणि शनि ९० डिग्रीवर असेल ज्यामुळे केंद्र नामक योग निर्माण होत आहे. या राशींना मोठा लाभ मिळू शकतो. जाणून घेऊ या, सूर्य आणि शनिमुळे निर्माण होणारा केंद्र योग कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह एक दुसऱ्यांवर ९० डिग्रीवर असतात किंवा चौथ्या किंवा दहाव्या स्थानावर असतात, तेव्हा केंद्र योग निर्माण होतो. हा योग अत्यंत शुभ असतो. सूर्य आणि शनिचा विचार केला तर ४ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी सूर्य आणि शनि एक दुसर्‍यांपासून ९० डिग्रीवर असेल या दरम्यान शनि कुंभ आणि सूर्य राशीमध्ये विराजमान असतील.

हेही वाचा : पुढील १२० दिवस शनी करणार मालामाल; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज पैसा

वृषभ राशी (Vrishabha Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी केंद्र योग अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. शनिबरोबर सूर्याची कृपा प्रत्येक क्षेत्रात दिसून येईल. त्यामुळे धनलाभ निर्माण होऊ शकतो. तसेच जीवनात आनंद दिसून येईल. खूप काळापासून अडकलेले कामे पूर्ण होऊ शकतात.कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते.
आर्थिक स्थिती उत्तम राहीन. तसेच पैसा वाचवण्याक हे लोक यशस्वी ठरतील. वैवाहिक आयुष्य चांगले जाईल. समाजात मान सन्मान वाढेल. व्यवसायात पार्टनरशिपमध्ये येऊ शकतात ज्यामुळे चांगला नफा मिळू शकतो.

मिथुन राशी (Mithun Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी शनि आणि सूर्यापासून निर्माण होणारा केंद्र योग लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होऊ शकते. करिअरच्या क्षेत्रात भरपूर लाभ मिळू शकतो. या कामाचे कौतुक केले जाईल आणि यांची लोकप्रियता वाढेन तसेच व्यवसायात भरपूर लाभ मिळेन. जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. आर्थिक स्थिती उत्तम राहीन. आरोग्य उत्तम राहणार आहे.

हेही वाचा : Shani Margi 2024 : शनीदेव कुंभ राशीत मार्गी! कुंभसह ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा अन् यश

मीन राशि (Meen Zodiac)

मीन राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनिचा केंद्र योग लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या लोकांसाठी कुटुंबाचा संपूर्ण साथ मिळेन. अडकलेले काम पूर्ण होऊ शकतात. करिअरमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेन ज्यामुळे या राशीचे लोक आपल्या ध्येय प्राप्त करण्यात यशस्वी होऊ शकतात. पदोन्नतीबरोबर पगारात सुद्धा वाढ होऊ शकते. दांपत्य जीवनात आनंद दिसून येईल. तसेच पैसे कमावण्याचे नवीन स्त्रोत दिसून येईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology surya and shani created kendra yog will be lucky for three zodiac they get money and wealth ndj