Astrology : ज्योतिषशास्त्रामध्ये शिव जी च्या पूजेला खूप महत्त्व आहे. शिव हे देवांचे देव म्हणून ओळखले जातात. तसेच यांना भैरव नावाने सुद्धा ओळखले जाते. सृष्टीचे उत्पत्ति, स्थिती आणि संहार शिवला मानले जाते. असं म्हणतात, शिवची पूजा केल्याने व्यक्तीचे दोष कमी होतात आणि भक्तांवर शिवचा आशीर्वाद कायम असतो. २०२५ हे वर्ष ग्रहाच्या दृष्टीने खूप खास असणार आहे. कारण या वर्षी अनेक ग्रह गोचर करणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, २०२५ मध्ये काही राशींवर शिवजीची विशेष कृपा दिसून येणार आहे. शिवच्या कृपेने या राशींचे नशीब बदलू शकते. जाणून घेऊ या त्या कोणत्या राशी आहेत, ज्यांना नवीन वर्षामध्ये महादेवाचा आशीर्वाद मिळणार आहे.
हेही वाचा : २०२५मध्ये या ३ राशीच्या लोकांचे नशीब चमकणार! महादेवाच्या कृपेने मिळणार पैसा आणि मान-सन्मान
मेष राशी (Mesh Rashi)
मेष राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष आनंदाने भरलेले दिसून येईल. या दरम्यान या लोकांना धनलाभ आणि चांगल्या संधी मिळू शकतात. करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे योग जुळून येईल. जुन्या अडचणी दूर होतील. न्यायालयीन प्रकरणात यश मिळू शकते. घर कुटुंबात सुख शांती लाभू शकते. शिवच्या कृपेने प्रत्येक कामात यश प्राप्त होऊ शकते.
सिंह राशी (Singh Rashi)
सिंह राशीच्या लोकांसाठी हे नवीन वर्ष अत्यंत शुभ ठरणार आहे. नवीन वर्षांमध्ये या लोकांना नशीबाचा साथ मिळेन. या दरम्यान या लोकांचे अडकलेले काम पूर्ण होतील. नोकरीमध्ये यश मिळू शकते. या लोकांचा पगार सुद्धा वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीव संधी मिळतील. शिवच्या कृपेमुळे कुटुंबात आनंद येणार आणि जीवनात मान सन्मान मिळणार.
मकर राशी (Makar Rashi)
मकर राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष प्रत्येक दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. शिवच्या कृपेमुळे या लोकांना मोठे यश प्राप्त होऊ शकते. समाजात मान सन्मान वाढणार आणि धन संपत्तीमध्ये लाभ मिळेन. आरोग्य उत्तम राहीन. जीवनात प्रत्येक प्रकारची सुविधा मिळणार. जोडीदाराचे सहकार्य मिळेन.