January Astrology 2025 : येत्या काही दिवसांमध्ये नवीन वर्ष सुरू होत आहे. हे नवीन वर्ष आपल्यासाठी कसे असणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. काही राशींसाठी हे नवीन वर्ष शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्ष २०२५ मध्ये शनिच्या चालीमध्ये परिवर्तन काही राशींच्या लोकांसाठी अतिशय फायद्याचे ठरू शकते. जानेवारी महिन्यात सूर्यासह बुध शुक्र सुद्धा राशी बदलून या महिन्याला तीन राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली बनवणार आहे. जाणून घेऊ या, जानेवारी महिन्यात राशी परिवर्तन कोणत्या राशीसाठी फायद्याचे ठरू शकते. (astrology three zodiac signs get money and wealth in a January first month of new year 2025)
जानेवारी २०२५ मध्ये ग्रह गोचर
४ जानेवारी २०२५ मध्ये बुध ग्रह धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे.
१४ जानेवारी २०२५ ला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे.
मेष राशी
जानेवारी महिना मेष राशीच्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर राहीन. आर्थिक अडचणी दूर होतील. नोकरी करणाऱ्या लोकांचा पगार वाढू शकतो आणि पदोन्नती होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे. कुटुंबात सुख शांती सुद्धा दिसून येईल. हा महिना या राशीसाठी अतिशय भाग्यशाली राहणार आहे.
मिथुन राशी
जानेवारी २०२५ या महिन्यात मिथुन राशीचे लोक कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवणार. या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहीन. हे लोक सुट्ट्यांमध्ये चांगला वेळ घालवणार. व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्या लोकांची चांगली कमाई होईल. मिथुन राशीचे नशीब चमकणार.
सिंह राशी
जानेवारी २०२५ हा महिना सिंह राशीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय फायदेशीर राहीन. नोकरी करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात आनंद दिसून येईल. कामाचा तणाव खूप कमी राहीन. या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहीन आणि या लोकांना वैवाहिक सुख मिळणार.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)