वैदिक ज्योतिषशास्त्रात जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा दुसऱ्या ग्रहासोबत येतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. काही लोकांसाठी हा ग्रहांचा संयोग शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतो. यावेळी सूर्य, बुध आणि शनिचा संयोग मकर राशीत आहे. हा संयोग १३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत राहील. या संयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर होईल. पण तीन राशींना विशेष फायदे होऊ शकतो.
कन्या : कन्या राशीच्या लोकांना त्रिग्रही योग तयार झाल्याने नशिबाची साथ मिळेल. हे लोक ज्या कामात हात घालतात, त्याचा त्यांना फायदा होतो. कन्या ही रास सूर्याचा मित्र बुध ग्रहाची राशी आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतील. या लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. यासोबतच पगार वाढण्याची शक्यताही दिसत आहे. करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याचीही चिन्हे आहेत.
वृषभ : त्रिग्रही योग तयार झाल्याने या राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या सकारात्मक राहील. तुम्हाला अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीवर शुक्राचे राज्य आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र आणि शनि ग्रह यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा राहणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमची वेतनवाढ अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्यास, यावेळी होऊ शकते. या वर्षी मार्चनंतर तुमचे लग्न होण्याची शक्यताही आहे.
Astrology: ‘या’ ४ राशींच्या लोकांसाठी सोन्याची अंगठी असते खूप फायदेशीर!
तूळ : ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योगाची निर्मिती फलदायी ठरेल. तूळ राशीवर शुक्राचे राज्य आहे आणि शुक्र आणि शनिदेव यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील. कुंडलीच्या पाचव्या, दहाव्या आणि अकराव्या घरात जेव्हा जेव्हा एखादा ग्रह भ्रमण करतो तेव्हा करिअर आणि नवीन नोकरीत बदल होतो. नोकरीतील बदलामुळे पगारात चांगली वाढ अपेक्षित आहे. व्यवसायातही फायदा होऊ शकतो.