Virgo Astrological Predictions 2 february 2025 : २ फेब्रुवारी २०२५ दिवशी माघ महिन्याच्या शुल्क पक्षाची उदय तिथी चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी रविवारी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांपर्यंत असेल, त्यानंतर पंचमी तिथी सुरू होईल. या तिथीला उत्तरभाद्रपद नक्षत्र आणि शिव योगाचा संयोग असेल, यानंतर सिद्ध योग होईल. या दिवशी अभिजात मुहूर्त दुपारी १२ वाजून ०९ मिनिटांपासून ते १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत असेल. याशिवाय २ फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे. या दिवशी सरस्वतीची पूजा केली जाते. या दिवसापासून वसंत ऋतूला सुरुवात होते. त्यामुळे हिंदू धर्मात वसंत पंचमीला महत्वाचे स्थान आहे. तसेच आज गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आहे. त्यामुळे आजचा हा शुभ दिन कन्या राशीच्या लोकांसाठी ठरेल का फलदायी, त्यांच्या आयुष्यात नेमके कोणते बदल घडतील जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कन्या राशीच्या व्यक्तींना कसा जाईल आजचा दिवस (How will today be for Virgo people?)

कन्या राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, त्यांना उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. आवडी-निवडी वर भर द्याल. एकमेकांची बाजू उत्तमरीत्या समजून घ्याल. पत्नीच्या शांत स्वभावाची जाणीव होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

कन्या राशीचे आजचे आर्थिक राशिभविष्य (Astrology Predictions: Virgo Finance Horoscope Today)

कोणतेही काम घाईने करणे टाळावे लागेल. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. दिवसाच्या सुरुवातीला आर्थिक समस्या जाणवू शकतात पण संध्याकाळपर्यत अनेक गोष्टी तुमच्या बाजूने असतील.

कन्या राशीचे करिअरविषयीचे राशिभविष्य (Astrology Predictions: Virgo Career Horoscope Today)

हा दिवस तुमच्यासाठी संमिक्ष परिणाम देणार असेल, समाजात तुमचा मान प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या काही मोठ्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यात नवीन संधी येतील. व्यवसायात दीर्घकालीन योजनांना गती मिळेल. प्रगतीची संधी मिळेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

कन्या राशीचे आजचे नातेसंबंधांविषयीचे राशिभविष्य (Astrology Predictions: Virgo Love Horoscope Today)

कुटुंबातील सदस्यांसोबत मजेत वेळ घालवाल. जोडीदाराच्या शोधात असलेल्या व्यक्तींना लग्नासाठी चांगले प्रस्ताव येतील. तुमच्या सासरच्या व्यक्तीकडून तुम्हाला काही चांगली बातमी कळू शकते. भविष्याची चिंता मनात नकारात्मकता आणू शकते, त्यामुळे अधिक विचार करणे टाळा.