आपल्या मुलीसाठी योग्य वर मिळावा, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. प्रत्येक मुलीला वाटत असते की तिचा भावी पती किंवा जीवनसाथी तिचा आदर करणारा असावा. त्याने तिच्यावर खूप प्रेम करावे. त्यामुळे आई वडिलांनी योग्य वर शोधावा, त्यामुळे आयुष्य आनंदाने जाऊ शकेल. ज्योतिषशास्त्रात वधू आणि वरांबद्दल बरीच भाकीतं वर्तवली आहेत. कुमारी मुलीला तिच्या राशीनुसार कोणत्या प्रकारचा वर मिळेल याबद्दलही सांगण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊया राशीनुसार कोणत्या मुलीला कोणता वर मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • मेष: ज्योतिषांच्या मते, या राशीच्या मुलींना सुंदर आणि शिकलेला वर मिळतो. त्यांचे वर धार्मिक स्वरूपाचे असल्याचे सांगितले जाते.
  • वृषभ: ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या मुलीच्या पतीला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. याशिवाय तुलनेने कमी शिकलेले वरात मिळतो, असं सांगण्यात आलं आहे.
  • मिथुन: ज्योतिषांच्या मते मिथुन राशीच्या मुलींना गर्विष्ठ पती मिळतो असं मानले जाते. त्यांना प्रत्येक गोष्टीचा राग येत असतो.
  • कर्क: ज्योतिषांच्या मते, या राशीच्या मुलींचे पती त्यांचा खूप आदर करतात. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा काही घडत नाही तेव्हा त्यांना रागही येतो.
  • सिंह: ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की या राशीच्या मुलींना खूप आदरणीय पती मिळतात. यासोबतच त्यांची मुलंही स्वभावाने चांगली असतात.
  • कन्या : ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या मुलींचे पती चंचल स्वभावाचे असतात. ते सुंदर असतात, त्याचबरोबर त्यांचे काही अफेअर्स असल्याचेही बोललं जातं.

Astrology 2022: मंगळ ग्रहाचा १६ जानेवारीला धनु राशीत गोचर; प्रेमसंबंधांवर होणार परिणाम

  • तूळ : तूळ राशीच्या मुलींचे पती त्यांच्या वैवाहिक जीवनाबाबत खूप गंभीर असतात. असं असलं तरी त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचा राग येत असतो.
  • वृश्चिक: या राशीच्या मुलींचे पती स्वभावाने खूप चांगले असतात आणि त्यांना उत्तम संवाद साधायचा असतो. यासोबतच ते रोमँटिक असल्याचेही सांगण्यात आले आहे.
  • धनु: धनु राशीच्या मुलींना भाग्यवान नवरा मिळतो असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार तो पत्नीचे म्हणणे ऐकण्यास तयार असतो.
  • मकर : या राशीच्या मुलींना गोड स्वभावाचे नवरे मिळतात असे मानले जाते. पतीमध्ये कठीण प्रसंगांना तोंड देण्याची क्षमता असते.
  • कुंभ : ज्योतिषांच्या मते, कुंभ राशीच्या मुलींचे पती एकलकोंडी स्वभावाचे असतात. या लोकांना एकटे राहणे आवडते.
  • मीन: ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या मुलींना सुंदर आणि चांगला पती मिळतो, असे सांगितले आहे. शिवाय नवरा आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असतो.
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology which zodiac sign girl get good husband know rmt