ज्योतिषशास्त्रानुसार तीन राशी अग्नितत्त्वाच्या राशी मानल्या जातात. यात मेष, सिंह आणि धनू राशींचा समावेश असतो. असं म्हणतात की या राशींसाठी सूर्य हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि या राशीचे लोक धाडसी, नेतृत्व करणारे आणि रागीट स्वभावाचे असतात पण तुम्हाला मेष राशीच्या लोकांचा स्वभाव माहिती आहे का?
बारा राशींमध्ये प्रथम स्थानावर असणारी रास म्हणून मेष राशीला ओळखले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे लोक स्पष्टवक्ते आणि निर्भयी असतात. आज आपण मेष राशीच्या लोकांचे स्वभावगुण जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धाडसी स्वभाव

ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांचा खूप धाडसी स्वभाव असतो आणि ते नेहमी निर्भयी असतात. असे मानले जाते की संकटाचा ते हसतमुखाने सामना करतात आणि प्रत्येक संकटातून ते मार्ग काढतात.

हेही वाचा : Surya Grahan 2023: ‘या’ दिवशी आहे वर्षातील दुसरे सूर्यग्रहण; ‘या’ राशींना राहावे लागू शकते सावध, अडचणी वाढणार?

अष्टपैलू

ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीच्या लोकांना आयुष्यात नवनवीन गोष्टी करण्याची नेहमी इच्छा असते त्यामुळे ते अष्टपैलू असतात.

हसतमुख स्वभाव

या राशीचे लोक हसतमुख स्वभावाचे असतात, असे मानले जाते. या लोकांमध्ये नेहमी ऊर्जा भरभरून असते, त्यामुळे ते कोणतीही गोष्ट मन लावून करतात, असं म्हणतात.

अहंकारी स्वभाव

या राशीचे लोक थोडे अहंकारी स्वभावाचे असतात. या राशीच्या लोकांना जे माहिती असतं, तेच ते खरे मानतात.

हेही वाचा: बारा राशींनुसार जाणून घ्या व्यक्तीचा स्वभाव; वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते?

जिद्दी

या राशीचे लोक खूप जिद्दी असतात आणि त्यांना राग लवकर येतो, असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार, अनेकदा ते कोणत्याही गोष्टीचा विचार न करता निर्णय घेतात, ज्यामुळे त्यांना पुढे अनेक संकटांना तोंड द्यावे लागते.

अस्थिरता

असं म्हणतात की या राशीचे लोक खूप जास्त अस्थिर असतात आणि ते एका गोष्टीवर फार काळ टिकत नाहीत त्यामुळे त्यांच्या पदरी अनेकदा अपयश आणि निराशा येते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology zodiac sign aries horoscope nature and personality read what astrologist said ndj