August Astrology : ऑगस्ट महिना ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या महिन्यात अनेक ग्रह त्यांची चाल बदलणार आहे. काही ग्रहांनी त्यांची चाल बदलली आहे. या महिन्यात सूर्य, मंगळ, शुक्र, बुध आणि चंद्र सह शनि देव चाल बदलणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच बुध ग्रह वक्री झाले आहेत. (august horoscope news zodiac signs will get money & wealth in next 26 days)
आता १६ ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सिंह राशीमध्ये आधीच बुध आणि शुक्र विराजमान आहे. त्यानंतर शनि पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या पदावर १८ तारखेला प्रवेश करणार आहे. त्यानंतर मंगळ २६ ऑगस्टला मिथुन राशीमध्ये गोचर करणार आणि शुक्र २५ ऑगस्टला कन्या राशीमध्ये विराजमान होणार. गुरु आणि सूर्य नक्षत्रात परिवर्तन करणार त्याबरोबर चंद्र संपूर्ण महिना सर्व १२ राशींमध्ये गोचर करताना दिसून येईल.
सात ग्रहांची चाल बदलल्यामुळे काही राशींना याचा फायदा होऊ शकतो. त्या राशी कोणत्या, जाणून घेऊ या.
मिथुन राशी
ऑगस्ट महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या लोकांची कमाई वाढू शकते. आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी नवीन स्त्रोत त्यांना मिळू शकतात. या महिन्यात या लोकांना प्रत्येक कामात यश मिळू शकते. करिअरमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकणार.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना फायदेशीर ठरू शकतो. ग्रहांची स्थिती बदलल्यामुळे या राशीच्या लोक धार्मिक कार्यांकडे वळतील. या लोकांची आर्थिक स्थिती स्थिर राहीन. खर्चावर नियंत्रण ठेवा. कठीण काळात यांना घर कुटुंबाचे सहकार्य लाभेल. लव्ह लाइफ मध्ये सुख समृद्धी लाभेल.
कन्या राशी
ऑगस्ट महिना कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या महिन्यात हे लोक खूप सकारात्मक दिसून येईल. प्रत्येक कामात ते सहभागी होतील. धार्मिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग दिसून येईल. आरोग्य सुद्धा उत्तम राहील. लहान मुलांबरोबर ते चांगला वेळ घालवतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)