Budh Planet Transit 2022: बुध १ ऑगस्ट रोजी राशी बदलणार आहे. बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, तर्क, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा कारक ग्रह आहे. १ ऑगस्टला बुध सिंह राशीत प्रवेश करेल. ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या राशीतील बदलाला खूप महत्त्व दिले जाते. ग्रहांच्या राशीतील बदलांचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. बुध ग्रहाच्या राशी बदलामुळे काही राशींना शुभ परिणाम मिळतील, तर काही लोकांना सावध राहण्याची गरज आहे. चला जाणून घेऊया बुधाची राशी बदलल्याने कोणत्या राशींना फायदा होईल.
सिंह राशी
१ ऑगस्टपासून बुध सिंह राशीत प्रवेश करणार असल्याने सिंह राशीला त्याचा विशेष फायदा मिळणार आहे. तसंच त्यांच्या जीवनात महत्वाचे बदल होणार आहेत. या काळात तुम्हाला मनःशांती लाभेल. तसंच तुमचा आत्मविश्वास वाढेल. मात्र, तुम्हाला संयम ठेवणं आवश्यक आहे. तुम्हाला अचानक आईकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक सुखात वाढ होईल. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. उत्पन्न वाढेल, पण दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल. नोकरीत उच्च अधिकार्यांचे सहकार्य लाभेल, प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. या कालावधीत भावनांवर नियंत्रण ठेवा म्हणजे प्रत्येक काम चांगलं होईल.
(हे ही वाचा: Lord Shani Dev Remedies: शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी करा हे सोपे उपाय; नशीब अचानक बदलून जाईल)
कन्यारास
या काळात कन्यारास असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात आत्मविश्वास वाढेल आणि त्यामुळे चांगली प्रगती होईल. कौटुंबिक कुटुंबात धार्मिक कार्ये होण्याची संभावना आहे. संतती सुखात वाढ होईल, मात्र रागाचा अतिरेक टाळा. उच्च शिक्षण आणि संशोधन इत्यादींसाठी परदेशी स्थलांतर होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता निर्माण होत आहे. स्थान बदलणे देखील शक्य आहे. या काळात तुम्हाला जोडीदाराचे सहकार्य मिळेल. ज्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन चांगले होण्याची संभावना आहे.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशी असणाऱ्या लोकांच्या आयुष्यात येणारा काळ चांगला आहे. शैक्षणिक कार्यात वाढ होईल आणि मान-सन्मान मिळेल. स्वभावात चिडचिडेपणा असेल, पण आत्मविश्वास वाढेल. कामात उत्साह राहील. नोकरी आणि कार्यक्षेत्रात विस्तार होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल. स्थलांतराचीही शक्यता आहे. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. धार्मिक स्थळी सत्संग वगैरेसाठी जाऊ शकता. या काळात तुम्हाला तुमच्या मित्रांचे सहकार्य मिळेल. ज्यामुळे तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतील.
( हे ही वाचा: Mangal Gochar in Mesh Rashi: ‘या’ ४ राशींनी येणाऱ्या २० दिवसात सावध राहिलं पाहिजे; होऊ शकते मोठे नुकसान)
मीन राशी
तुम्हाला तुमच्या आईचे हा काळात विशेष सहकार्य मिळेल. ज्यामुळे तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. संभाषणात संयमी राहा. स्पर्धा परीक्षा आणि मुलाखती इत्यादी आनंददायी परिणाम देतील.कुटुंबात धार्मिक संगीताची कामे होतील. या काळात तुम्हाला वाहन खरेदीचा योग आहे. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, परंतु तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल. तसंच या कालावधीत तुमचे उत्पन्न वाढेल. एकंदरीत तुमची भरभराट होण्याची शक्यता आहे.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)