दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पंचांगानुसार, यंदा १२ नोव्हेंबरला दिवाळीचा सण देशभरात साजरा होणार आहे. या दिवशी गणेश आणि देवी लक्ष्मीच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाच्या दिवाळीला शुभ राजयोग बनणार आहे. शनिदेव आपल्या कुंभ राशीत विराजमान असल्याने शश राजयोग तयार होणार आहे, तर सोबतच आयुष्यमान आणि सौभाग्य योग बनणार आहे. तसेच १६ आणि १७ नोव्हेंबरला रुचक आणि युक्त योग घडणार आहे. हे सर्व अद्भूत योग तब्बल ५०० वर्षांनी यंदाच्या दिवाळीला घडणार आहेत. त्यामुळे काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

‘या’ राशींना होऊ शकतो धनलाभ

मेष राशी

यंदाच्या दिवाळीला शुभ राजयोग घडल्याने मेष राशीच्या लोकांची दिवाळी गोड होऊ शकते. या राशींच्या लोकांचे भाग्य उजळू शकते. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. चांगली बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात तुम्हाला नफा होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे. अनेक स्थानिकांना परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. 

shani gochar 2025 uttarashada nakshatra
Shani Gochar 2025 : २७ वर्षांनंतर शनिचा नक्षत्र बदलाने ‘या’ राशींचे लोक जगतील राजासारखे जीवन, भासणार नाही पैसा अन् संपत्तीची कमतरता
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maha Shivratri 2025 Shubh Sanyog
महाशिवरात्रीला निर्माण होत आहे दुर्मिळ संयोग! ‘या’ ३ राशींचे नशीब पलटणार, भगवान शंकर पूर्ण करणार त्यांची प्रत्येक इच्छा
Mars Gochar 2025
येणारे ४९ दिवस मंगळ देणार पैसा; ‘या’ तीन राशींच्या नोकरी, व्यवसायात होणार प्रगती
Guru-Shukra's parivartan Rajyoga
आता ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; गुरू-शुक्राचा परिवर्तन राजयोग देणार प्रत्येक कामात यश, प्रेम अन् नुसता पैसा
saturn transit 2025
येणारे ५६ दिवस शनी देणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे प्रेम संबंध अन् आर्थिक स्थिती सुधारणार
Numerology Valentine Day 2025
Numerology Valentine Day 2025 : व्हॅलेंटाईन डेच्या आधी ‘या’ जन्मतारखेच्या लोकांवर होईल प्रेमाचा वर्षाव, जोडीदाराबरोबरचे मतभेद, वाद होतील दूर
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार

(हे ही वाचा : २०२४ सुरू होताच राहू-केतू ‘या’ राशींना बनवणार श्रीमंत? वर्षभर मिळू शकते बक्कळ धनलाभाची संधी )

धनु राशी

धनु राशींच्या लोकांचे अद्भूत राजयोग घडल्याने नशीब चमकण्याची शक्यता आहे. भौतिक सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी नांदू शकते. नोकरीशी संबंधित नवीन प्रस्ताव मिळू शकतात. नोकरी-व्यवसायात प्रगती होऊ शकते. कामात यश मिळू शकतो. या काळात धनु राशींच्या लोकांच्या हाती पैसा येईल ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होण्याची शक्यता आहे.

मकर राशी

शनिदेवाच्या कृपेने मकर राशींच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. या काळात शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. या दिवसांत आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. व्यवहारातून मोठा लाभ होऊ शकतो. या राशीतील लोकांना पूर्वी केलेल्या चांगल्या कर्माचे शुभ फळ मिळू शकते. जे विवाहासाठी पात्र आहेत त्यांना या काळात योग्य वधू किंवा वर मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader