Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Date, Time, Schedule, Shubh Muhurat : अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघे काही मिनिटे शिल्लक आहेत. यानिमित्त संपूर्ण देशात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळतेय. सोमवारी (२२ जानेवारी) अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीवर अभिषेक केला जाणार आहे. रामलल्लाच्या स्वागतासाठी आता प्रत्येक रामभक्त तयारी करत आहे. गर्भगृहात श्रीरामाची प्रतिष्ठापना केल्यानंतर भाविकांना आपल्या कुलदैवताचे सहज दर्शन घेता येणार आहे. परंतु, अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि हा दिवस का निवडला गेला हे जाणून घेऊया.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा दिवस आणि मुहूर्त (Ayodhya Ram Mandir Ramlala Pran Pratishtha Ceremony Full Schedule)

२२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२.२९ वाजून ८ सेकंद ते १२.३० वाजून ३२ सेकंद असा मुहूर्त राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी काढण्यात आला आहे. यात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी केवळ ८४ सेकंदांचा शुभ मुहूर्त ठरवण्यात आला आहे.

article written by tarkatirtha on future of marxism topic
तर्कतीर्थ-विचार : मार्क्सवादाचे भवितव्य
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
nuclear energy production information in marathi
कुतूहल : अणुऊर्जा – एक अपरिहार्य पर्याय
Ratha Saptami 2025
Ratha Saptami 2025: रथ सप्तमीला सूर्याला प्रसन्न करण्यासाठी कशी करावी पूजा? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्व
concepts of logos dialectic socrates philosophy
तत्त्व-विवेक : पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ‘सॉक्रेटिक वळण’
Vasant Panchami 2025
Vasant Panchami 2025: वसंत पंचमीच्या दिवशी करा या श्लोक आणि मंत्राचा जप, माता सरस्वतीची होईल कृपा, प्रत्येक कामात मिळेल यश
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
Ganesh Jayanti 2025 Date, Time Shubh muhurat in marathi
Maghi Ganesh Jayanti 2025 : माघी गणेश जयंतीची पूजाविधी आणि शुभ मुहूर्त काय? वाचा एका क्लिकवर

२२ जानेवारी २०२४ ही तारीख इतकी शुभ का?

शुभ मृगाशिरा नक्षत्र सोमवारी (२२ जानेवारी) पहाटे ३ वाजून ५२ मिनिटांनी सुरू होईल, तर २३ जानेवारीला (मंगळवार) पहाटे ४ वाजून ५८ मिनिटांपर्यंत कायम राहील. २२ जानेवारीला अभिजात मुहूर्त सकाळी ११:५१ ते दुपारी १२:३३ पर्यंत आहे.

प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय?

हिंदू धर्मात प्राणप्रतिष्ठेला विशेष महत्त्व आहे. पण, प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय समजून घेऊ. प्राणप्रतिष्ठा म्हणजे कोणत्याही देवतेच्या मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी त्यात जीव प्रस्थापित केला जातो. प्राणप्रतिष्ठा म्हणजे मूर्तीत प्राणशक्ती प्रस्थापित करणे. त्यामुळे मूर्तीवर अभिषेक केल्यानंतर मूर्तीचे देवतेत रूपांतर होते. वेद आणि पुराणातील विधींप्रमाणे प्राणप्रतिष्ठा केली जाते. पण, कोणत्याही मूर्तीच्या अभिषेकाचे वेगवेगळे टप्पे असतात. ज्यामध्ये अधिवास, जलाधिवास, अन्नाधिवास, फलाधिवास, धृतअधिवास यांसारख्या अधिवासांचा समावेश आहे.

Rahu Gochar : राहू गोचरमुळे ‘या’ तीन राशींच्या लोकांच्या आयुष्यात निर्माण होईल अशांतता? होऊ शकते आर्थिक नुकसान

२१ आणि २२ जानेवारीला राम मंदिरात होणार ‘हे’ कार्यक्रम

२१ जानेवारी २०२४ : या दिवशी यज्ञविधीमध्ये विशेष पूजा आणि हवन केले जाईल, यादरम्यान रामलल्लाला १२५ कलशांसह दिव्य स्नान घातले जाईल. याचबरोबर सकाळी मध्याधीवास आणि सायंकाळी शय्याविधी असतील.

२२ जानेवारी २०२४ : मधल्या काळात मृगाशिरा नक्षत्रात रामलल्लाच्या मूर्तीवर गर्भगृहात अभिषेक करण्यात येईल आणि विधीनुसार पूजा केली जाईल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader