Baba Vanga And Nostradamus Scary Predictions 2025 : नवीन वर्षाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक आहेत. प्रत्येकजण नव वर्षाचे उत्साहात, जल्लोषात स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत, यासाठी अनेक प्लॅन्स तयार केले जात आहे. दरम्यान नवीन वर्ष चांगलं जाण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहेत. मात्र २०२५ वर्षाबाबत काही भीतीदायक भविष्यावाण्या करण्यात आल्या आहेत. बाबा वेंगा आणि नॉस्ट्राडेमस त्यांच्या आश्चर्यकारक आणि अचूक भविष्यवाण्यांसाठी ओळखले जातात. त्यांनी आत्तापर्यंत मानवाचा एलियन्सशी असलेला संपर्क, व्लादिमीर पुतिन यांच्यावरील हत्येचा प्रयत्न, युरोपमधील दहशतवादी हल्ले आणि राजा चार्ल्सची अशांत राजवट यांसारख्या अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. या पलीकडे दोघांनी २०२५ बाबतही काही भविष्यवाण्या केल्या आहेत ज्यावर आपण नजर टाकू ….

ब्रिटनसाठी २०२५ हे साल ठरेल अशुभ

बाबा वेंगा आणि नॉस्ट्राडेमस यांनी २०२५ साली युरोपमध्ये विनाशकारी संघर्ष होऊ शकतो अशी भविष्यवाणी केली होती. त्यानुसार मोठा संघर्ष झाल्याचेही पाहायला मिळाले, यात आता २०२५ च्या सुरुवातीला पुन्हा एकदा असेच अंदाज बांधतले जात आहेत. मात्र हे वर्ष ब्रिटनसाठी अशुभ ठरणारे असेल असाही अंदाज आता व्यक्त करण्यात येत आहे.

baba Vanga Predictions 2025 astrology in marathi
Baba Vangas Predictions 2025 : २०२५ मध्ये ‘या’ पाच राशी होणार अफाट श्रीमंत! नवीन वर्षात प्रचंड धनलाभाची संधी; बाबा वेंगांची भविष्यवाणी
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Due to Budhaditya Rajyoga in January
जानेवारीमध्ये बुधादित्य राजयोगामुळे या ४ राशीच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ! सूर्य अन् बुधची होईल विशेष कृपा
Shatgrahi Yog in meen 2025
आता नुसता पैसा; मार्चपासून मीन राशीत निर्माण होणार तब्बल सहा ग्रहांची युती, ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस
Mangal rashi parivrtan 2024
पुढील ८४ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशींचे लोक कमावणार बक्कळ पैसा
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
Singh Rashi Bhavishya 2025 in Marathi
Leo 2025 Rashi Bhavishya : २०२५ मध्ये सिंह राशींना ‘हे’ महिने अत्यंत फायद्याचे; शिक्षण, नोकरी ते विवाह, कसे असेल वर्ष? जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा

बल्गेरियातील रहिवासी बाबा वेंगा हे अंध होते, ज्यांचे १९९६ मध्ये निधन झाले. ९/११ चा हल्ला, राजकुमारी डायनाचा मृत्यू, चेरनोबिल आपत्ती आणि ब्रेक्झिट यांसारख्या महत्त्वाच्या जागतिक घटनांचे भाकीत त्यांनी केले होते. त्यांच्याप्रमाणे फ्रेंचमधील नॉस्ट्राडेमस यांनीही याबाबत अचूक भाकिते करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते.

Baba Vangas Predictions 2025 : २०२५ मध्ये ‘या’ पाच राशी होणार अफाट श्रीमंत! नवीन वर्षात प्रचंड धनलाभाची संधी; बाबा वेंगांची भविष्यवाणी

बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, एक विनाशकारी युद्धामुळे संपूर्ण युरोप देश उद्ध्वस्त होणार आहे, यामुळे संपूर्ण युरोप खंडच नष्ट होऊ शकतो. तसेच रशिया केवळ टिकणार नाही तर जगावर वर्चस्व गाजवेल. युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारचा अंदाज अधिकच अस्वस्थ करणारा आणि धडकी भरवणारा आहे. याशिवाय अनेक नैसर्गिक आपत्तींविषयी देखील त्यांनी भाकीत केलं आहे. ज्यात अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील विनाशकारी भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक याबाबतही त्यांनी भविष्यवाण्या केल्या आहेत.

नॉस्ट्रॅडॅमसचे भाकीत काय?

फ्रेंच ज्योतिषी आणि वैद्य नॉस्ट्रॅडॅमस यांनी आपल्या १६ व्या शतकातील ‘लेस प्रोफेसीज’ या पुस्तकात अशुभ भविष्यवाण्या लिहिल्या होत्या. त्यांच्या मते, युरोप स्वतःच्या सीमेत सुरू होणाऱ्या क्रूर युद्धांमध्ये व्यस्त राहील, ज्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे शत्रू निर्माण होतील. यामुळे युरोपाला विनाशकारी युद्धाला देखील सामोरे जावे लागू शकते.

दरम्यान २०२५ साठी नॉस्ट्रॅडेमस यांनी आणखी काही भीतीदायक भाकीत केले आहे. विनाशकारी युद्ध आणि साथीच्या आजारानंतर ब्रिटन उद्ध्वस्त होईल असे भाकीत त्यांनी केले आहे. तसेच भूतकाळातील भयंकर महामारी पुन्हा येऊ शकते असाही इशारा दिला आहे.

नॉस्ट्राडेमस यांनी २०२५ हे निर्णायक वर्ष देखील ठरु शकते असे भाकीत केले आहे. ज्यामध्ये पाश्चात्य शक्तींचा प्रभाव कमी होईल आणि नवीन जागतिक शक्तींचा उदय होईल. प्रदीर्घ काळ चाललेले युद्ध संपेल आणि सैनिकही युद्धाला कंटाळतील असे भाकीत त्यांनी केले.

Story img Loader