Baba Vangas Predictions 2025: ‘बाल्कनच्या नॉस्ट्रॅडॉम्स’ म्हणून ओळखले जाणारे बाबा वेंगा यांनी २०२५ या वर्षासाठी केलेली भविष्यवाणी सध्या जोरदार चर्चेत आहे. त्यांनी नववर्ष २०२५ साठी राशीविषयक भविष्यवाणीदेखील केली आहे. त्यात त्यांनी २०२५ मध्ये पाच राशींना आर्थिक लाभ संभवतो, असे भाकीत केले आहे. या राशींना नवीन वर्षात अफाट श्रीमंती अनुभवता येऊ शकते, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. ज्योतिषी आणि तज्ज्ञांच्या मतेही २०२५ हे नवीन वर्ष काही राशींसाठी खूप खास असणार आहे. पण, बाबा वेंगा यांनी २०२५ मध्ये कोणत्या राशींना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल, असे भाकीत केले आहे त्याविषयी जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाबा वेंगा यांच्या अंदाजानुसार, मेष, वृषभ, मिथुन, कर्क व कुंभ या पाच राशींच्या लोकांना २०२५ मध्ये मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. सर्व राशींमध्ये या पाच राशी सर्वांत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे नवीन वर्ष या राशींना लाभदायी ठरेल.

२०२५ मध्ये या पाच राशींवर राहील देवी लक्ष्मीची कृपा? (Baba Vangas Predictions For 2025: 5 Zodiacs To Get Rich)

१) मेष

बाबा वेंगा यांच्या मते, मेष राशीच्या व्यक्तींना २०२५ मध्ये मोठे व्यावसायिक टप्पे गाठता येऊ शकतात. या राशीचे लोक गतिमान आणि महत्त्वाकांक्षी स्वभावासाठी ओळखले जातात. त्यामुळे ते या वर्षात धैर्याने आणि अचूकतेने नवीन आर्थिक संधी मिळवू शकतात. आर्थिक गुंतवणूकीतून त्यांना फायदा संभवतो. या काळात त्यांना नशिबाची पूर्ण साथ लाभेल. त्यामुळे प्रत्येक कामात यश आणि यशाबरोबर आर्थिक सुबत्ता लाभेल.

२) वृषभ

बाबा वेंगा यांच्या मते, वृषभ राशीचे लोक मेहनती आणि आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बागळणारे असतात. दरम्यान, २०२५ मध्ये त्यांच्या अनेक प्रयत्नांचा यश येईल. दीर्घकालीन गुंतवणूक आणि करिअरमधील प्रगतीमुळे स्थिरता लाभून, आर्थिक वाढ होईल. बाबा वेंगा यांनी सांगितले की, मेहनत आणि चिकाटीमुळे ते मोठी आर्थिक प्रगती साधू शकतात. ते करोडपती होऊ शकतात.

January 2025 Planet Transits : जानेवारीत ‘या’ राशींना मिळणार आनंदाची गोड बातमी; सूर्य, बुधासह ५ ग्रहांच्या राशी परिवर्तनाने धनलाभासह प्रत्येक कामात यश

३) कर्क

२०२५ मध्ये कर्क राशीचे लोक योग्य निर्णय घेत, अनेक आर्थिक अडथळ्यांवर यशस्वीरीत्या मात करतील. गुंतवणूक, व्यावसायिक भागीदारी आणि अनेक चांगल्या प्रोजेक्ट्समधून त्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो. बाबा वेंगा यांच्या म्हणण्यानुसार, कर्क राशीचे लोक २०२५ मध्ये भावनिक बुद्धिमत्ता आणि धोरणात्मक निर्णय घेऊन, आर्थिक स्थिती मजबूत करु शकतात.

४) मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना नवीन वर्षात अनपेक्षित संधींद्वारे आर्थिक लाभ मिळू शकतो. अनुकूलता आणि संवाद कौशल्यामुळे त्यांना ट्रान्स्पोर्ट आणि व्यवसाय क्षेत्रात अनेक संधी मिळतील. बाबा वेंगा यांच्या अंदाजानुसार, नावीन्यपूर्ण कल्पना सत्यात उतरवून, ते आपली आर्थिक प्रगती साधू शकतात.

५) कुंभ

कुंभ राशीचे लोक नवीन वर्षात आर्थिक उंची गाठण्याचा संकल्प करतील. शनीच्या प्रभावामुळे त्यांचा दृढनिश्चय बळकट होईल आणि त्यामुळे ते अपारंपरिक कल्पनांना यशस्वी उपक्रमांमध्ये बदलण्यास सक्षम होतील. बाबा वेंगा यांचे भाकीत असे सुचवते की, २०२५ हे कुंभ राशीसाठी एक निश्चित चांगले अन् आनंदाचे वर्ष असेल. विशेषत: तंत्रज्ञान, कला व अपारंपरिक उद्योग यांसारख्या क्षेत्रांत असलेल्या लोकांसाठी हे वर्ष खास असणार आहे.

(टीप- सदर लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. लोकसत्ता डॉट.कॉम त्याची पुष्टी करत नाही.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba vangas predictions 2025 these five zodiac signs lucky are likely to get rich next year check detailed prophecies here new year 2025 sjr