Basant Panchami 2024 : वसंत पंचमी म्हणजेच १४ फेब्रुवारी हा दिवस खूप खास आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या युतीमुळे पंच दिव्य योग तयार होत आहे. हिंदू धर्मात बसंत पंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी देवी सरस्वतीची विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे. याशिवाय या दिवशी रेवती आणि अश्विनी नक्षत्राचा शुभ योग तयार होत आहे. शनीच्या राशीत म्हणजेच मकर राशीमध्ये मंगळ, शुक्र आणि बुध यांची युती आहे, ज्यामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. याचबरोबर मेष राशीमध्ये चंद्र आणि गुरूच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होत असून मकर राशीत मंगळ आणि शुक्र यांच्या युतीमुळे धनशक्ती राजयोग तयार होत आहे, शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग आणि मंगळ ग्रहाचा मकर राशीत प्रवेशामुळे रुचक योग निर्माण होत आहे. रुचक योग पंचमहापुरुष योगांपैकी एक मानला जातो. वसंत पंचमीच्या दिवशी अनेक शुभ योग जुळून आल्याने देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असेल. चला जाणून घेऊया कोणत्या राशींचे भाग्य चमकू शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा