Daily Horoscope in Marathi : २ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असणार आहे. चतुर्थी तिथी रविवारी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांपर्यंत चालेल, त्यानंतर पंचमी तिथी सुरू होईल. तसेच ९ वाजून १५ मिनिटांपर्यंत शिव योग जुळून येईल , त्यानंतर सिद्धी योग सुरु होईल. तसेच उत्तरा भाद्रपद नक्षत्र रात्री १२ वाजून ५३ पर्यंत जागृत असेल. आज राहू काळ ४ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ६ वाजेपर्यंत असणार आहे.
याशिवाय २ फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी सरस्वती पूजन म्हणजेच वसंत पंचमी साजरी केली जाते. या दिवसापासून वसंत ऋतूला सुरुवात होते. तर आज कोणत्या राशीच्या जीवनात यश, पैसा, प्रसिद्धी आणि सुख येईल हे आपण जाणून घेऊया…
२ फेब्रुवारी पंचांग व राशिभविष्य (Aries To Pisces Horoscope) :
मेष:- प्रेमभावना वाढीस लागेल. भागिदारीतून चांगला लाभ संभवतो. व्यापार विस्ताराचा विचार कराल. आपले महत्व इतरांना पटवून द्याल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.
वृषभ:- मनातील आकांक्षा पूर्ण होतील. स्त्रीवर्गाशी मैत्री कराल. तुमच्यातील शालीनता दिसून येईल. चारचौघात तुमचे कौतुक होईल. आर्थिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल.
मिथुन:- औद्योगिक वातावरण चांगले राहील. बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल. सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. सहृदयतेने वागणे ठेवाल. मित्रांच्या ओळखीने कामे केली जातील.
कर्क:- मनाची विशालता दाखवाल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. कलेला पोषक वातावरण मिळेल. मुलांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. वाचनाची आवड जोपासाल.
सिंह:- जवळच्या सहलीचा आनंद घ्याल. मित्रमंडळी जमवाल. सासुरवाडीची मदत मिळेल. काही कामे कमी श्रमात पार पडतील.
कन्या:- उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. आवडी-निवडी वर भर द्याल. एकमेकांची बाजू उत्तमरीत्या समजून घ्याल. पत्नीच्या शांत स्वभावाची जाणीव होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.
तूळ:- लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. आळशीपणा करू नका. हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल. ऐषारामाच्या गोष्टींची आवड निर्माण होईल.
वृश्चिक:- मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. मित्र परिवारात भर पडेल. आधुनिक विचार मांडाल. हातून चांगले लिखाण होईल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील.
धनू:- मानसिक समाधान लाभेल. मदत करण्याचा आनंद कमवाल. घरात टापटीपपणा ठेवाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल.
मकर:- भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल. प्रवासाची हौस पूर्ण करता येईल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. निसर्गाच्या सहवासात रमून जाल.
कुंभ:- कामाचा व्याप वाढू शकतो. गप्पा-गोष्टींमध्ये वेळ जाईल. आवडत्या वस्तु खरेदी कराल. एकलकोंडेपणा बाजूला ठेवावा. गुरूजनांचा सहवास लाभेल.
मीन:- मानसिक चंचलता जाणवेल. अचानक धनलाभ संभवतो. सर्वांशी आपलेपणाने वागाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चैनीकडे कल राहील.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर