Shani Nakshatra Parivartan 2024: ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. तसेच वेळोवेळी तो नक्षत्र परिवर्तनही करतो. सध्या शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशीत उपस्थित असून तो २०२५ मध्ये मीन राशीत तब्बल ३० वर्षानंतर राशी परिवर्तन करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्योतिषशास्त्रानुसार शनी सध्या पूर्वीभाद्रपद नक्षत्रामध्ये असून तो ३ ऑक्टोबर रोजी १२ वाजून ३० मिनिटांनी शतभिषा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे आणि २७ डिसेंबरपर्यंत तो या नक्षत्रामध्ये असेल. या नक्षत्राचा स्वामी ग्रह राहू असून कुंभ रास आहे. शनीचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.

या दोन राशींची होणार चांदी

वृषभ

शनीचा शतभिषा नक्षत्रातील प्रवेश वृषभ राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायी ठरेल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील, त्यामुळे या काळात तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळेल. परदेश जाण्याचे योग आहेत. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबाची आर्थिक परस्थिती अधिक मजबूत होईल. आयुष्यात आनंदी आनंद असेल.

हेही वाचा: “कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी

धनु

धनु राशीच्या व्यक्तींना शनीचा शतभिषा नक्षत्रातील प्रवेश खूप सकारात्मक फळ देणारा ठरणार आहे. या काळात तुम्हाला धनलाभ होईल आणि तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील, नात्यात गोडवा येईल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before diwali shani will give a lot of money due to the effect of nakshatra transformation there will be an increase in the wealth of these two zodiac signs sap