Bhadra Mahapurush Raja Yoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह सर्वात लहान आणि सूर्याच्या सर्वात जवळ स्थित असलेला ग्रह आहे. बुध ग्रह वाणी आणि तर्कशक्तीचा कारक मानला जातो, जो प्रत्येक ग्रहाप्रमाणेच एका विशिष्ट कालावधीत राशी बदलतो. सात दिवसांनंतर बुध मिथुन राशीत जाईल. यामुळे या शुभयोगाचा तीन राशींना लाभ होणार आहे असे मानले जाते.
भद्र राजयोगाचा या राशींना होईल फायदा
ज्योतिषशास्त्रानुसार, या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात २४ जूनला बुध ग्रह राशी बदलून मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल आणि भद्रा महापुरुष राजयोग निर्माण होईल. वैदिक ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जाणारा हा योग तिन्ही राशींवर भगवान बुध ग्रहाच्या कृपेचा वर्षाव करेल.
तुळ
ज्योतिषशास्त्रामध्ये या काळात, बुध ग्रहाच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांचे भाग्य त्यांना नवीन संधी देईल आणि त्यांना काही चांगल्या बातम्या मिळतील असे मानले जाते. असे म्हणतात की, या काळात तूळ राशीच्या जातकांची प्रतिष्ठा वाढेल आणि त्यांच्यासाठी काही तरी साध्य करण्याची हीच वेळ आहे.
हेही वाचा – शुक्रदेवाला प्रिय आहेत ‘या’ राशी? ‘या’ राशींचे लोक कमावू शकतात भरपूर पैसा
कुंभ
ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचे गोचर कुंभ राशीच्या लोकांचे भाग्य बदलू शकते. या राशीच्या लोकांना त्यांच्या मुलांकडून काही तरी चांगली बातमी मिळू शकते असे मानले जाते. असे म्हणतात की, या काळात कुंभ राशीच्या जातकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. प्रेमसंबंधामध्ये यश मिळू शकते.
हेही वाचा – Lucky Zodiac Sign : ‘या’ राशींवर असते भगवान विष्णूंची विशेष कृपा? मिळू शकतो मानसन्मान आणि समृद्धी
मीन
ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचे गोचर मीन राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकते. या काळात बुध ग्रह या राशीच्या लोकांना संपत्तीचा लाभ देईल आणि नवीन खरेदी करता येईल असे मानले जाते.असे म्हणतात की या काळात मीन राशीच्या जातकांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि मानसन्मान मिळेल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)