Weekly Lucky Rashi 23 To 29 September 2024 : Bhadra Rajyog: सप्टेंबर महिन्याची शेवटचा आठवडा अनेक राशींसाठी खास असू शकतो.२३ ते २९ सप्टेंबर या आठवड्यात अनेक मोठेराजयोग तयार होत आहेत. अशा स्थितीमध्ये काही राशींच्या जातकांचे झोपलेले नशीब जागू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार, या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, शुक्र, बुध आणि शनि आपापल्या मूळ त्रिकोण राशीमध्ये स्थित आहेत. अशा स्थितीत अनेक राजयोग तयार होत आहेत. शनि कुंभ राशीत मूळ त्रिकोणी राशीत स्थित आहे, त्यामुळे शश राजयोग तयार होत आहे. याच बुध कन्या राशीत असल्याने भद्रा राजयोग तयार होत असून शुक्र तूळ राशीत असल्याने मालव्य राजयोग तयार होत आहे. याचसह सूर्य आणि बुध मिळून बुद्धादित्य योग तयार होत आहेत. कुटुंबासह चांगला वेळ घालवाल. तसेच तुम्हाला संपत्ती आणि समृद्धीही मिळेल. चला जाणून घेऊया या आठवड्यात कोणत्या राशींचे भाग्य उजळू शकते…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप खास ठरू शकतो. या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंदाचा असू शकतो. बऱ्याच काळापासून त्रास देणाऱ्या समस्या आता नष्ट होती. तसेच तुम्ही तुमच्या कुटुंबासह चांगला वेळ घालवाल. आयुष्यातील सततचा गोंधळ आता संपुष्टात येईल. विद्यार्थ्यांसाठीही हा आठवडा भाग्यदायी ठरू शकतो. करिअर आणि बिझनेसमध्ये अफाट यशासह मोठा आर्थिक फायदाही होऊ शकतो. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. यामुळे आयुष्यात एकामागून एक आनंद येत राहतात. मित्रांसह सहलीचे नियोजन करू शकाल.

हेही वाचा –दिवाळीनंतर गुरु ग्रह करणार चंद्राच्या नक्षत्रात प्रवेश! राजासारखे जीवन जगतील ‘या’ राशींचे लोक

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा हा आठवडा खूप अनुकूल आहे. या राशीच्या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये खूप फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही एखाद्या मोठ्या योजनेत भागीदार होऊ शकता. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तसेच तुम्ही एखाद्या नामांकित संस्थेसह काम करू शकता. हे तुमच्या करिअरमध्ये आणखी प्रगती करण्यास मदत करू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकाल. वडिलोपार्जित संपत्तीचे संपादन होऊ शकते. तसेच कोर्ट केसेसमध्येही यश मिळू शकते. लव्ह लाईफच्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलणे, तुमचा तुमच्या जोडीदारासह चांगला वेळ जाईल.

हेही वाचा –सूर्य कन्या राशीत प्रवेश करताच निर्माण झाला षडाष्टक योग! ‘या’ राशीवर असेल शनिदेवची वक्र दृष्टी, काय होईल परिणाम?

कन्या राशी

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे. बौद्धिक क्षमता वाढेल. तसेच हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला आहे. एकाग्रता वाढेल. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थीही यश संपादन करू शकतात. तुमच्या बौद्धिक क्षमतेमुळे तुम्ही अनेक क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना ऑफर मिळू शकते. कुटुंबासह चांगला वेळ घालवाल. या आठवड्यात आरोग्य चांगले राहील.

(टीप – हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhadra rajyoga is formed in the last week of september the fortunes of the zodiac people will brighten snk