Aries To Pisces Horoscope Today : २६ मार्च २०२४ रोजी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी दुपारी १ वाजून ४३ मिनिटांपर्यंत राहील. दुपारी १२ वाजून २५ मिनिटांपर्यंत सिद्ध योग राहील. धनिष्ठा नक्षत्र रात्री अडीच वाजेपर्यंत राहील. याशिवाय आजपासून पंचक सुरू होत आहे. राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. याशिवाय आज भागवत एकादशी आहे. या दिवशी वारकरी आणि विठ्ठल भक्त विठ्ठलाची मनोभावे पूजा करतात. तर आजच्या दिवशी मेष ते मीन राशींचं नशीब कसं बदलणार हे पाहूया…

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

२६ मार्च पंचांग व राशिभविष्य:

मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)

आवडते खेळ खेळाल. मुलांशी मन-मोकळ्या गप्पा माराल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. झोपेची तक्रार जाणवेल. लहानांशी मैत्री कराल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)

कामातून चांगला लाभ मिळेल. तुमचा खिसा भरलेला राहील. घरातील वातावरण खेळते असेल. कल्पना शक्तीला चांगला वाव मिळेल. इतरांचे भर भरून कौतुक कराल.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)

जवळच फिरण्याचा आनंद घ्याल. प्रेमाला अधिक बहर येईल. वात विकार वाढू शकतात. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. वेळेचे बंधन पाळावे लागेल.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)

घरगुती कामात दिवस जाईल. आपलेच म्हणणे खरे कराल. नवीन गोष्टीकडे ओढ वाढेल. मोहापासून दूर राहावे लागेल. कामात स्त्रियांची मदत होईल.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)

तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. आपली योग्यता दाखवून द्याल. वादाचे मुद्दे बाजूस सारावेत. पत्नीशी मतभेद संभवतो. मुलांची समस्या दूर करावी.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)

पचनाचा त्रास जाणवेल. गप्पांमधून मतभेद वाढू शकतात. धार्मिक स्थळांना भेट द्यावी. मनाची विशालता दाखवून द्याल. कलेला पोषक वातावरण मिळेल.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)

कमी श्रमात कामे करण्याकडे भर राहील. शेअर्स मध्ये पैसे गुंतवाल. सासुरवाडीचे लोक भेटतील. अचानक धनलाभ संभवतो. सांपत्तिक दर्जा सुधारेल.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)

पत्नीचा लाडिक हट्ट पूर्ण कराल. कर्तव्याची जाणीव ठेवून वागाल. महिलांचा योग्य मान राखला जाईल. कामाचा विस्तार वाढवाल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)

नातेवाईकांशी मतभेद होऊ शकतात. कौटुंबिक खर्चाचे नियोजन करावे लागेल. मत्सराला मनात थारा देऊ नका. स्वभावात उधळेपणा येईल. घरगुती कार्यक्रम आखले जातील.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)

कामाचा वेग वाढेल. ठाम निश्चय केले पाहिजेत. पित्त विकार बळावू शकतात. अडचणींवर मात करता येईल. थोडीफार दगदग वाढू शकते.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)

बौद्धिक चलाखी दाखवाल. समय सूचकता ठेवावी लागेल. फार हटवादीपणा करू नये. उत्सुकतेने गोष्टी जाणून घ्याल. अती चिकित्सा करू नका.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)

सामाजिक दर्जा उंचावेल. मानाने कामे मिळवाल. तुमच्यातील उदारपणा दिसून येईल. स्वत:चे स्वत्व जपण्याचा प्रयत्न कराल. आत्मविश्वास वाढीस लागेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagwat ekadashi on 26 march 2025 aries to pisces changing life in diffrent ways read 12 zodic signs horoscope in marathi asp