Bhaubeej 2022 Date time Shubha Muhurat: भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांना टिळक लावतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना करतात. यावेळी २६ ऑक्टोबरल भाऊबीज साजरी होणार आहे. या शुभ मुहूर्तावर बहिणी भावाला टिळक लावतात. त्यानंतर भावाची आरती केली जाते आणि त्यानंतर दोघे एकमेकांना भेटवस्तू देतात.
मान्यतेनुसार, या दिवशी मृत्यूचा देव यमराज आपली बहीण यमुनेकडे तिने अनेकवेळा बोलावल्या नंतर तिच्या भेटीला गेला होता. यमुनेने यमराजाला भोजन दिले आणि त्याचे औक्षण करून त्यांच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली. प्रसन्न होऊन यमराजांनी बहीण यमुना यांना वरदान मागायला सांगितले. यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये आणि या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ती तुला घाबरणार नाही. यमराजाने यमुनेला वरदान दिले. या दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली असे म्हणतात.
( हे ही वाचा: Diwali 2022 : या भाऊबीजेला भावाला काय गिफ्ट द्यायचे हा प्रश्न पडलाय? मग पर्यायांची ही यादी एकदा पाहाच)
भाऊबीजचा शुभ मुहूर्त
यावर्षी भाऊबीज २६ ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त २ तास १५ मिनिटांचा आहे. शुभ मुहूर्त दुपारी १ वाजून १८ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असेल.