Aries To Pisces Horoscope Today in Marathi : २५ फेब्रुवारी २०२५ रोजी फाल्गुन कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी मंगळवारी दुपारी १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत चालेल, त्यानंतर त्रयोदशी तिथी सुरू होईल. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजून १६ मिनिटांपासून सुरू होणारा वरियान योग बुधवारी सकाळी ५ वाजून ५१ मिनिटांपर्यंत चालू राहील. उत्तराषाढा नक्षत्र मंगळवारी संध्याकाळी ६ वाजून ३१ मिनिटांपर्यंत जागृत असेल. आज राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. याशिवाय मंगळवारी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी भौम प्रदोष व्रत सुद्धा आहे आहे. प्रदोष व्रत हे प्रदोष काळी म्हणजेच संध्याकाळी केले जातात. प्रदोष तिथीला शंकराचे पूजन केले जाते. तर आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार हे आपण जाणून घेऊया…

२५ फेब्रुवारी पंचांग व राशिभविष्य :

मेष:- कौटुंबिक शांतता जपावी. आपली छाप पडण्यात यशस्वी व्हाल. मनमोकळ्या स्वभावाचे दर्शन घडवाल. कौटुंबिक कामात दिवस जाईल. मानसिक ताण जाणवेल.

वृषभ:- जवळच्या प्रवासात सावधानता बाळगावी. मनातील नसती भीती दूर सारावी. मानसिक चांचल्य जाणवेल. नवीन गोष्टी आवडीने जाणून घ्याल. उगाचच त्रागा करू नका.

मिथुन:- आवेगाला आवर घालावी लागेल. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. व्यावसायिक कमाईकडे लक्ष द्यावे. आवाजात गोडवा ठेवावा. वैवाहिक सौख्याकडे लक्ष ठेवावे.

कर्क:- मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल. चटकन निराश होऊ नका. बौद्धिक चलाखी दाखवावी. वागण्या-बोलण्यात सज्जनपणा ठेवाल. भावनाशीलता वाढू शकते.

सिंह:- वैचारिक स्थिरता ठेवावी. नैराश्याला दूर सारावे. प्रवासात सतर्कता बाळगावी. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. तुमच्या संपर्कातील लोकात भर पडेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.

कन्या:- मैत्रीचे संबंध जपावेत. स्त्री समूहात वावराल. सुखासक्तपणा जाणवेल. कामात काहीशी चालढकल कराल.

तूळ:- प्रेमाच्या दृष्टीने मैत्री घट्ट होईल. चौकसपणा दाखवाल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. कामात वारंवार बदल करू नका. आपला दर्जा टिकवण्याचा प्रयत्न कराल.

वृश्चिक:- खर्च वाढू शकतो. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत. घरातील कामात अडकून पडल्यासारखे वाटेल. शब्द जपून वापरावे लागतील. गुंतवणुकीत फसगत होण्याची शक्यता आहे.

धनू:- श्रम व दगदग वाढेल. क्षुल्लक कारणांनी खिळून पडल्यासारखे वाटेल. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. गैरसमजातून वाद वाढू देऊ नका.

मकर:- जुन्या प्रकरणातून त्रास संभवतो. खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल. मानसिक स्वास्थ्य जपावे. स्त्री वर्गापासून दूर राहावे. कोर्ट कचेर्‍यांची कामे त्रासदायक ठरू शकतात.

कुंभ:- गप्पांमध्ये वेळ घालवाल. मानापमानात अडकून पडू नका. मौल्यवान वस्तु खरेदी केल्या जातील. कष्टाला मागे पुढे पाहू नका. मित्र मंडळींशी सलोखा ठेवावा लागेल.

मीन:- आपली प्रतिष्ठा जपावी. विरोधकांच्या कारवाया वाढू शकतात. काही अनपेक्षित बदल दिसून येतील. सहकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल. कामाचे योग्य नियोजन करावे लागेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader