Budh Graha Biggest Gochar of 2024: बुध ग्रहाची बदलणारी चाल ही अनेकदा शुभ व अशुभ दोन्ही प्रकारचे परिणाम घेऊन येते. येत्या नववर्षात बुध ग्रह आपली चाल पुन्हा बदलणार आहे. वैदिक ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार हे २०२४ मधील बुध ग्रहाचे सर्वात मोठे परिवर्तन असणार आहे. बुध हा ग्रहांचा राजपुत्र म्हणून ओळखला जातो त्यामुळे जेव्हा बुधाचे राशी परिवर्तन होईल तेव्हापासून काही राशींच्या नशिबाला कलाटणी मिळणार आहे. तसेच काही राशींच्या कुंडलीत राजयोग सक्रिय होऊन त्यांना राजेशाही जीवनाचा अनुभव घेता येणार आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार २०२४ च्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २ जानेवारी २०२४ ला बुध ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश घेणार आहेत. बुध राशी परिवर्तन करून मार्गी होणार आहे, हा थेट प्रभाव तीन राशींसाठी लाभदायक कालावधी घेऊन येणार आहे, नेमक्या या तीन राशी कोणत्या व त्यांना कोणत्या स्वरूपात काय लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुध ग्रहाचे राशी परिवर्तन; १८० अंशात मार्गी होताना ‘या’ राशींना करणार मालामाल

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

कन्या राशीसाठी बुध ग्रहाचे राशी परिवर्तन हे शुभ ठरणार असल्याचे समजतेय. विशेषतः व्यापारी वर्गाला याचा मोठा लाभ होऊ शकतो, नवीन संपर्क जोडले जातील. सर्वांशी आपुलकीने वागल्या- बोलल्यास आपल्याला त्याचे प्रचंड शुभ परिणाम दिसून येतील. व्यवसायात येणारे अडथळे दूर होऊ शकतात. विद्यार्थी वर्गाला सुद्धा हा कालावधी लाभदायक ठरू शकतो. लक्ष एकाग्र करण्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल, तुमच्या कष्टाला- मेहनतीला नशिबाची साथ लाभू शकते. आर्थिक अडचणी दूर होणारा एखादा बदल घडून येईल. आई वडील हे लक्ष्मीकृपेचे माध्यम ठरू शकतात.

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)

वृश्चिक राशीसाठी बुध ग्रहाचे राशी परिवर्तन फायद्याचे ठरणार असल्याचे समजतेय. समाजात नाव मोठं करणारी एखादी कामाची संधी चालून येऊ शकते ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्येही अत्यंत सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. भावंडं तुमच्यासाठी नशीब उजळवणारे माध्यम ठरू शकतात. प्रेम व नाती जपणे तुमच्या हिताचे ठरू शकते. बुध कृपेने अडकून पडलेली कामे मार्गी लागू शकतात परिणामी तुमचे अडकून पडलेले धन सुद्धा पुन्हा मिळू शकते.

हे ही वाचा<< ५ वर्षांनी शनीच्या राशीत शुक्र- मंगळ एकत्र; २०२४ मध्ये तीन राशींना अचानक धनलाभ होणार; स्रोत काय असेल पाहा

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

बुध ग्रहाचे राशी परिवर्तन मकर राशीसाठी लाभदायक ठरू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या रूपात येणारे अडथळे दूर होऊ शकतात. तुम्ही कामातून उत्तर देणेच फायद्याचे ठरू शकते. मकर राशीत काही अंशी कुंभेत स्थित शनीचा सुद्धा प्रभाव कायम असल्याने बुध ग्रहाच्या चालीने मिळणारे फायदे शनीच्या रूपात द्विगुणित होऊ शकतात. कुटुंबासह प्रवासाचे योग येतील, नववर्षातील संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला चिकाटीने काम करणे आवश्यक आहे. एक फायद्याची बाब म्हणजे तुम्हाला या कालावधीत नशिबाची साथ मिळू शकते. तुमचे सातत्य हे धनप्राप्तीचे सुद्धा निमित्त ठरू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biggest budh gochar on 2 january 2024 these three rashi nasib to turn will experience rajyog lakshmi blessing signs with money svs