Budhaditya Rajyog 2023: वैदिक ज्योतिशास्त्रानुसार, बुधादित्य राजयोग हा अत्यंत शुभ मानला जातो. ज्या मंडळींच्या कुंडलीत असा योग असतो त्यांना समाजात मान सन्मान अनुभवता येतो असे मानले जाते. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, लवकरच वृषभ राशीत बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. अगोदरच वृषभ राशीत शुक्राचा वास आहे. आणि त्यात आता बुध देव सक्रिय झाल्याने याचा प्रभाव काही विशेष राशींवर दिसून येऊ शकतो. या राशींना विशेषतः माता लक्ष्मीचा कृपाशिर्वाद व प्रगतीच्या संधी आहेत. या राशींना स्वबळावर एखादी मोठी झेप घेता येऊ शकते. या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना बुध देव नेमका कसा प्रभाव दाखवून देऊ शकतात हे पाहूया…

वृषभ रास (Taurus Zodiac)

बुधादित्य राजयोग हा वृषभ राशीसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकतो. आपल्या गोचर कुंडलीत लग्न स्थानी हा राजयोग तयार होत आहे. यामुळे आपल्या नियमित आयुष्यात व एकूण जीवनशैलीत सुधारणा दिसून येऊ शकते. तुमच्या आरोग्यासाठी हा राजयोग अत्यंत शुभ सिद्ध होण्याची चिन्हे आहेत. तुमचे मान्यवर लोकांशी संपर्क वाढू शकतात. या संपर्कातून तुमच्या करिअरला व आयुष्याला कलाटणी मिळू शकते. तुमच्या वाणीवर व खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. या राजयोगाचा प्रभाव आपल्या गोचर कुंडलीत सातव्या स्थानी प्रबळ झाल्याने वैवाहिक आयुष्यात काहीसे चढउतार अनुभवता येतील. दोन्हीची तीव्रता समान असू शकते.

Gupt Navratri 2025
Gupt Navratri 2025: माघ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र का म्हटलं जातं? या काळात देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा ‘या’ प्रभावी स्तोत्रांचे पठण
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान
Venus Transit Impact on Mauni Amavasya 2025
Mauni Amavasya 2025: मौनी अमावस्येला शुक्राचे मीन राशीत भ्रमण, ‘या’ ३ राशींना नोकरी आणि व्यवसायात प्रचंड लाभाची संधी
Guru Margi 2025 Jupiter Margi in Taurus
Guru Margi 2025 : वसंत पंचमीनंतर चमकणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे भाग्य; गुरूच्या आशीर्वादाने होऊ शकता प्रचंड श्रीमंत
Shani Transit 2025
येणारे ६५ दिवस शनी देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य
mauni amavasya 2025
५० वर्षानंतर मौनी अमावस्येच्या दिवशी निर्माण होणार त्रिवेणी योग, चांदीसारखे चमकेल ‘या’ राशींचे नशीब, प्रचंड श्रीमंती व प्रेम मिळणार
shukra gochar 2025
धनलाभ होणार, बक्कळ पैसा मिळणार! १ फेब्रुवारीपर्यंत ‘या’ तीन राशींना शुक्र देणार भौतिक सुख अन् ऐश्वर्य

सिंह रास (Leo Zodiac)

बुधादित्य राजयोग सिंह राशीच्या करिअरला प्रगतीच्या दिशेने नेऊ शकतो. या काळात आपल्याला अनपेक्षित लोकांची भक्कम साथ मिळू शकते. नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी आपल्या ज्युनिअर्सना सांभाळून घ्यावे लागू शकते, यात तुमच्या संयमाची परीक्षा होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक झाल्याने भारावून जाल पण यातून अहंकार निर्माण होऊ देऊ नका. बेरोजगार मंडळींना नव्या नोकरीच्या संधी चालून येऊ शकतात. तुम्हाला सद्सद्विवेकबुद्धीच्या बळावर निर्णय घेण्याची गरज आहे. विनाकारण भावनिक होणे टाळा.

हे ही वाचा<< ८ ते १४ मे मध्ये ‘या’ राशींच्या नशिबाला कलाटणी? संकष्टीने सुरु झालेला आठवडा तुम्हाला कसा जाणार वाचा

कर्क रास (Cancer Zodiac)

कर्क राशीसाठी बुधादित्य राजयोग हा धन- धान्याने समृद्ध असा काळ घेऊन येऊ शकतो. तुम्हाला ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती त्या सर्व गोष्टी मार्गी लागू शकतात. तुमच्या कुंडलीत व्यापार व प्रगतीचा योग आहे. याचा अर्थ असा की येत्या काळात नवनवीन संधींना स्वीकारल्यास तुम्हाला आयुष्याला कलाटणी देता येऊ शकते. धार्मिक कामातील सहभाग वाढू शकतो. कुटुंबासह एखाद्या कमी अंतराच्या प्रवासाची संधी मिळू शकते, नातेसंबंध दृढ होण्यास हा कालावधी लाभदायक सिद्ध होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader