Scorpio Yearly Horoscope 2024 Predictions in Marathi: वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ हा तप्त ग्रह आहे. यात प्रचंड ऊर्जा असते. सृजनशीलतेसह विनाशाची ताकदही यात असते. अशा मंगळाच्या या वृश्चिक राशीत तापटपणा, अधीरता आणि फारसा विचार न करता झटपट निर्णय घेण्याची वृत्ती असते. वृश्चिक राशीच्या व्यक्ती स्वभावाने प्रेमळ आणि दिलदार असतात. त्यांना एका जागी शांत बसवत नाही. सतत कार्यरत राहायला त्यांना आवडते. आधी काम आणि मग आराम! त्यांच्या आरामामध्ये मात्र व्यत्यय आल्यास त्यांचा प्रचंड संताप होतो. मैत्री करतील तर जीवापाड करतील आणि एखाद्याशी शत्रुत्व पत्करतील तर त्याच्याकडे पुन्हा वळून देखील बघणार नाहीत. अशा या वृश्चिक राशीच्या व्यक्तींना २०२४ हे नवे वर्ष कसे जाईल त्याचा आढावा घेऊया.
यंदा संपूर्ण वर्षभर चतुर्थ स्थानातील कुंभ राशीतून शनी भ्रमण करणार आहे. करियरमध्ये चांगले यश मिळेल. तसेच मालमत्तेसंबंधीत कामांना चालना मिळेल. एप्रिल अखेरपर्यंत गुरू षष्ठ स्थानातील मेष राशीतून भ्रमण करेल. या कालावधी पर्यंत मध्यम गुरुबल असल्याने साधी सरळ कामे थोडी मेहनत घेऊन पूर्ण करावी लागतील. १ मेला गुरू सप्तम स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. चांगले गुरुबल प्राप्त होईल. तृतीयातील मकर राशीत वर्षभर प्लूटो असेल. समूह, गट यांचे हिरीरीने नेतृत्व कराल. पंचमातील मीन राशीत राहू आणि नेपच्यून भ्रमण करतील. गूढ विद्या, तंत्रज्ञानासंबंधीत कला शिकाल. लाभ स्थानात कन्या राशीत वर्षभर केतू भ्रमण करेल. मेअखेरीपर्यंत हर्षल षष्ठ स्थानातील मेष राशीतून भ्रमण करेल. हितशत्रूंपासून आपला बचाव होईल. १ जूनला हर्षल सप्तमातील वृषभ राशीत प्रवेश करेल. झटपट निर्णय घेण्याच्या वृत्तीला पुष्टी मिळेल. या महत्वाच्या ग्रह बदलांसह इतर ग्रहांच्या भ्रमणांचा विचार आणि अभ्यास करता २०२४ हे वर्ष वृश्चिक राशीच्या व्यक्तींना काय ग्रहफल देईल हे पाहूया….
जानेवारी :
नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच इतरांना आपल्या आनंदात सहभागी करून घ्याल. समाजकार्याची सुप्त इच्छा पूर्ण होईल. विद्यार्थी वर्गाला महत्वाच्या परीक्षेत चांगले यश मिळेल. त्यासाठीची मेहनत फळास येईल. नोकरी व्यवसायात आपल्या कार्याची दखल घेतली जाईल. त्याचा योग्य तो मोबदला देखील मिळेल. आनंदवार्ता समजतील. सहकारी वर्गाचे सहकार्य मिळवाल. विवाहितांनी आपल्या जोडीदारासह सामंजस्याने वागावे. दोघांनी एकमेकांचे मुद्दे नीट समजून घ्यावेत. गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळेल. घर, मालमत्तेसंबंधित कामात कायदेशीर बाबींवर चर्चा होईल. सर्वांची मते जुळणे कठीण असेल. प्रवासाचा जास्त थकवा जाणवेल.
फेब्रुवारी :
एकंदरीत उत्साहवर्धक महिना असेल. आपल्यातील आत्मविश्वासही वाढेल. आपले मुद्दे व्यवस्थित पटवून द्याल. विद्यार्थी वर्गाच्या मेहनतीला चांगले यश मिळेल. पण अशा यशाने हुरळून न जाता अभ्यासातील सातत्य वाढविण्याची गरज भासेल. नोकरी व्यवसायात बदतीची शक्यता आहेत. स्थानबदलही होऊ शकतो. हे आपल्या हिताचेच असेल. विवाहितांनी जोडीदाराच्या उणिवा बघण्यापेक्षा त्याच्यातील गुणविशेषांकडे बघावे. जीवन अधिक आनंदी आणि अर्थपूर्ण होईल. घरासंबंधीत कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. गुंतवणूकदारांना मर्यादित नफ्यावर समाधान मानावे लागेल. कोरड्या हवामानामुळे त्वचा फाटणे, रक्त येणे, पू होणे, कानाचा त्रास यांची शक्यता आहे.
मार्च :
मनाविरुद्ध घटना घडल्यास अतिचिडचिड करण्यापेक्षा त्याचा सारासार विचार करावा. त्यासाठी कोणाला कारणीभूत न मानता आपल्याच मनाशी संवाद साधावा. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाचे वेळापत्रक काटेकोर पाळावे. नियमितपणा आणि सातत्य राखल्यास उत्तम प्रचिती येईल. नोकरी व्यवसायातील कामे पूर्णत्वास जात असल्याचे समाधान मिळेल. दिलेला शब्द पूर्ण कराल. नैतिक मूल्ये जपाल. विवाहोत्सुक मंडळींना गुरुबल अपुरे पडेल. अजून थोडा धीर धरावा लागेल. विवाहित मंडळींना एकमेकांच्या सहवासाची संधी मिळेल. प्रेम व्यक्त करणे ही देखील एक कला आहे, हे ध्यानात असावे. लहानमोठे मतभेद दुर्लक्षित करावेत. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा कालावधी आहे. जपून व्यवहार करावेत.
एप्रिल :
अभ्यास वा नित्याच्या कामासोबत नव्या गोष्टी शिकाल. स्वतःचा उत्कर्ष साधाल. विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी चांगली संधी उपलब्ध होईल. आपल्या कष्टाचे चीज कराल. हुशारीसह व्यवहारज्ञान किती गरजेचे असते याचा प्रत्यय येईल. नोकरी व्यवसायात वरिष्ठ मंडळींसह वाद वाढवू नयेत. काही गोष्टी आपल्या मनासारख्या होणार नाहीयेत हे स्वीकारणे गरजेचे आहे. विवाहितांच्या बाबतीतही हाच नियम लागू पडेल. अशा गोष्टी ‘आहेत तशा स्वीकारणे’ या शिवाय पर्याय नसतो. घराच्या, प्रॉपर्टीच्या कामात तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. गुंतवणूकदारांनी या नव्या आर्थिक वर्षात जरा जपूनच पाऊल उचलावे. भरपूर पाणी प्यावे. शरीरातील आणि वातावरणातील उष्णतेपासून स्वतःला सांभाळावे.
मे :
वर्षातील महत्वाचा ग्रह बदल या महिन्यात होणार आहे. १ मेला गुरू सप्तमतील वृषभ राशीत प्रवेश करेल. चांगले गुरुबल प्राप्त होईल. विवाहोत्सुक मंडळींना वधूवर संशोधन सुरू करण्यास चांगले ग्रहबल मिळेल. विवाहित दाम्पत्यांनी कौटुंबिक जबाबदारी नेटाने आणि स्वखुशीने सांभाळावी. विद्यार्थी वर्गाने स्पर्धा परीक्षांची जय्यत तयारी सुरू करावी. निश्चित यश मिळेल. नोकरी व्यवसायात विरोधक आणि हितशत्रूंना योग्य धडे द्याल. पण ध्यानात असू द्यावे, अतिरिक्त आत्मविश्वास कामी येणार नाही. घर, प्रॉपर्टीच्या कामात गती येईल. त्या अनुषंगाने बऱ्याच नव्या गोष्टी समजतील. गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वतःच्या अनुभवातून कुठे थांबायचे हे देखील शिकाल.
जून :
१ जूनला हर्षल सप्तम स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. तर त्याच दिवशी मंगळ षष्ठ स्थानातील मेष राशीत प्रवेश करेल. दोन्ही ग्रह बलाढ्य आणि मोठे ऊर्जा स्रोत आहेत. आपल्याला भरपूर ऊर्जा देतील. अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल. मोठी चळवळ सुरू कराल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासातील तंत्रज्ञानाचे आकलन चटकन होईल. भाषा, परदेशी भाषा यांच्या अभ्यासात मन रमेल. नोकरी व्यवसायात आपण स्वतः पुढाकार घेऊन काही महत्वाच्या मुद्द्यांना वाचा फोडावी. निर्णय प्रगतिकाराक ठरेल. विवाहोत्सुक मुलामुलींच्या संशोधन कार्यास यश येईल. विवाहित मंडळींनी नाते जोपासावे, खुलवावे. एकमेकांवरील विश्वास दृढ करावा. गुंतवणूकदारांनी मोठी मजल मारू नये. उष्माघात, ताप, सर्दी यांचा त्रास सहन करावा लागेल.
जुलै :
हवामान बदलाचा आणि प्रदूषणाचा परिणाम आपल्या तब्येतीवर होईल. घसा धरणे, कफ होणे, छाती भरून येणे अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल. ग्रहयोगामुळे त्रास लांबेल. योग्य ती काळजी घ्यावी. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात व्यत्यय येईल. अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल. नोकरी व्यवसायात कामानिमित्त प्रवास कराल. काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागतील. पण ते अनेकांच्या हिताचे असतील. विवाहोत्सुक मंडळींनी संशोधन कार्य मनावर घ्यावे. विवाहित दाम्पत्यांच्या वैवाहीक जीवनात मंगळ, हर्षलमुळे तत्कालीन समस्या उदभवतील. शांत डोक्याने विचार करून आणि चर्चा करून या समस्यांवर उपाय शोधता येईल. गुंतवणूकदारांच्या पैशाचा योग्य परतावा मिळेल. हे आपल्या अभ्यासाचे, मेहनतीचे फळ असेल.
ऑगस्ट :
उगाच फुशारक्या मारणे आपल्याला कधीही जमणार नाही आणि आजवर जमलेही नाही. जे आहे ते आहे. नोकरी व्यवसायात अशा स्पष्टवक्तेपणामुळे कधी लाभ होईल तर कधी नुकसानही होईल. थोडे व्यावहारिक राहणे मात्र गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शिक्षक आणि मार्गदर्शक यांचा संपूर्ण पाठिंबा मिळेल. नव्या संधी उपलब्ध होतील. परदेशाशी संबंधित अभ्यासक्रम जरूर शिकाल. सातत्य आणि चिकाटी मात्र सोडू नका. उत्तम ग्रहबल आपल्या पाठीशी आहे, यशस्वी व्हाल. विवाहोत्सुक मंडळींना ओळखीतूनही आपला जोडीदार सापडेल. चौफेर लक्ष असू द्यावे. गुंतवणूकदारांना चांगले दिवस आहेत. आपली मर्यादा आपणच आखावी. घर, मालमत्ता या बाबत योग्य निर्णय घेता येईल.
सप्टेंबर :
सणासुदीच्या दिवसात उत्साह वाढेल. इतरांना उमेद द्याल. लहानमोठ्या गोष्टींसाठी चिडचिड टाळलीत तर खऱ्या अर्थाने आनंद उपभोगता येईल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावरील लक्ष विचलित होऊ देऊ नका. मित्रमंडळींसाठी वेळेची मर्यादा घालून घ्यावी. नोकरी व्यवसायात आपल्या कामाची पत वाढेल. इतरांवर आपल्या कार्यपद्धतीची छाप पाडाल. विवाहोत्सुक मुलामुलींना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. सुयोग्य जोडीदार मिळण्यास ग्रहांची चांगली साथ आहे. विवाहित दाम्पत्यांना कुटुंबासाठी अधिक वेळ द्यावा लागेल. यातूनच त्यांच्यातील प्रेमबंध दृढ होतील. मालमत्ता, प्रॉपर्टीच्या बाबतीत कामे पुढे सरकतील. गुंतवणूक करताना दीर्घकालीन योजना निवडाव्यात. अधिक लाभकारक ठरतील.
ऑक्टोबर :
सणासुदीच्या दिवसात आहार आणि व्यायाम याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आरोग्याची हेळसांड करू नका. विद्यार्थी वर्गाला अभ्यासक्रमातील शंकांचे निरसन करण्यासाठी तज्ज्ञांची गरज भासेल. महत्वाच्या संकल्पना स्पष्ट होणे फार आवश्यक आहे. नोकरी व्यवसायात महत्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी आपण स्वीकारल्याने कामात प्रगती होईल. अडचणी आल्या तरी त्या हिमतीने दूर कराल. गरजवंताला मनापासून मदत कराल. विवाहोत्सुक मुलामुलींना मनपसंत जोडीदार मिळेल. विवाहित दाम्पत्यांनी न पटणाऱ्या मुद्द्यांवरील वाद टाळावा. घरासंबंधीत कोर्ट कचेरीच्या कामात अडचणी येतील. अंतिम निर्णय लांबणीवर जाईल. गुंतवणूकदारांना धोक्याची सूचना मिळेल. सावधगिरी बाळगावी.
नोव्हेंबर :
विवाहोत्सुक मुलामुलींनी वधुवर संशोधन मनावर घ्यावे. योग्य जोडीदाराची निवड करण्यास ग्रहबल चांगले आहे. जोडीदाराशी जुळवून घेण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. गुंतवणूकदारांनी अल्पकाळात भरपूर पैसे मिळवण्याच्या मागे लागू नका. नोकरी व्यवसायात किती तरी गोष्टी अशा असतील की त्या आपल्या मर्जीने बदलता येत नाहीत. याचा त्रास करून घेण्यापेक्षा स्वीकार करावा. सोपे जाईल. विद्यार्थी वर्गाला नव्या गोष्टी, नवे तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळेल. देशांतर्गत प्रवास लाभदायक ठरेल. घराच्या, प्रॉपर्टीच्या संबंधित मुद्दा मांडताना त्यातील फायदे तोटे यांचा अभ्यासपूर्वक विचार मांडाल. हवाबदल आणि प्रदूषणामुळे सर्दी- खोकल्याचा खूप त्रास होईल.
डिसेंबर :
वर्षाच्या अखेरीस अनेक कामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न कराल. दिलेला शब्द पाळाल. आपल्यापेक्षा इतरांच्या इच्छा पूर्ण करण्यात आपल्याला धन्यता वाटेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. गुंतवणूकदारांना उत्तम धनलाभ होईल. नाव लौकिक वाढेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळेल. एकाग्रतेने अभ्यास कराल. नोकरी व्यवसायातील आपले व्यवस्थापन उत्तम असेल. विवाहित दाम्पत्यांनी योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णयाची वाखाणणी होईल. विवाहोत्सुक मंडळींना मनपसंत जोडीदार मिळेल. कोर्टाची कामे हळूहळू मार्गी लागतील. अडचणी दूर करत पुढे जाल. अचानक डोकेदुखीचा त्रास सुरू होईल. एकंदरीत २०२४ हे वर्ष वृश्चिक राशीस चांगले आहे. थोडीफार काळजी घेतल्यास , संयम राखल्यास अनेक गोष्टी मार्गी लागतील. बढती होईल. विवाह ठरेल. जे संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतील त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे उत्तम फळ मिळेल. घर, प्रॉपर्टी बाबत सावधगिरी बाळगून तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घेणे शक्य होईल. ‘सिर सलामत तो पगडी पचास’ या उक्तीनुसार तब्येत ठणठणीत ठेवलीत तर वर्षभरातील सगळी सुखं उपभोगता येतील.