Rahu Gochar in 2023: २८- २९ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री १२ वाजून ४१ मिनिटांनी राहू हा मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी शनी-मंगळ केंद्रयोग सुरू असेल. राशीचक्रातील शेवटच्या राशीत म्हणजे मीन राशीत राहूचे आगमन झाल्याने व्यक्ती आणि राष्ट्रे यांच्या कार्यकाळात मोठी स्थित्यंतर, आर्थिक उत्कर्ष अथवा अपकर्ष होण्याची शक्यता आहे. अचानकपणे येणाऱ्या आपत्तीमुळे देशाला वेगाने वळण देण्यास हा राहू सिद्ध आहे. त्यातील मीन राशीतील शेवटच्या चरणांवर असलेल्या झिटासिटी ताऱ्या जवळून होणाऱ्या या राहू भ्रमणामुळे आकस्मित आणि अकल्पित अशा घटना प्रत्यक्षपणे घडताना दिसून येतील. हा मीन राशीतील राहू देशातील अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांना कसा फलदायी होईल हे तपशीलवारपणे पुढे बघूया..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
1) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Kundali)
यांच्या कुंडलीत पंचमातून होणारे राहु भ्रमणा मूळे त्यांना व त्यांच्या पक्षाला जास्त मेहनत करावी लागणार असून, पक्षाचे व नेतृत्वाचे काही अंदाज बरोबर तर काही अंदाज सपशेल चुकू शकतात. पंतप्रधानांना पूर्व व उत्तर भागावर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे, तर दक्षिणेकडून त्यांना अनपेक्षित असा लाभ मिळू शकतो. मुस्लिम बहुल मतदार संघातून पंतप्रधानांना चांगले यश मिळवून दाखवता येईल.
2) राहुल गांधी (Rahul Gandhi Kundali)
यांच्या कुंडलीत चंद्राच्या चतुर्थात होणाऱ्या राहू भ्रमणामुळे त्यांच्या विजयाचे सर्व अंदाज धुळीस मिळतील. शत्रू चांगलाच जोर पकडणार असून, त्यांच्या आघाडीत अनेक पक्ष व त्यांचे नेते त्यांना जोरदार विरोध करणार आहेत. पक्षातील त्यांचे विरोधक यापुढेही त्यांना चुकीचे सल्ले देत राहणार आहेत, जेणेकरून नवनव्या प्रकारचे त्यांच्यावर आरोप लागून त्यांचं राजकीय जीवन आणखी खालावणार आहे. हा मीनेचा राहू त्यांच्या कुंडलीतील रवी-चंद्र-मंगळ यांच्या अशुभ योगात आलेला असून त्यांना व त्यांच्या आईसाठी आणखी कष्ट घ्यावे लागणार आहेत. स्वतः च्या प्रकृतीची सुद्धा त्यांना काळजी घ्यावी आहे.
3) प्रियांका गांधी वड्रा (Priyanka Gandhi Vadra Kundali)
यांच्या कुंडलित दिनांक 28 नोव्हेंबरला मीन राशीत प्रवेश करणारा राहू, त्यांच्या चंद्राच्या पंचमात येत असून, लगेचच त्यांच्या कुंडलीतील रवीच्या केंद्रातून जाणार असल्याने, राजकारणातील त्यांच्या जबरदस्त महत्वकांक्षेला हादरा बसणार आहे. त्यांच्या परिवारावर सुरू असलेल्या अनेक चौकशा तून महत्त्वाची गोपनीय बातमी बाहेर येणार असून, त्या यामुळे सत्तेच्या राजकारणातून थोड्या काळ लांबच राहणार आहेत. तसेच निवडणुकीसाठी त्यांचा पक्षाला फारसा कोणताही उपयोग होणार नाही.
4) गृहमंत्री अमित शहा (Amit Shah Kundali)
यांच्या कुंडलीत मीन राशीत प्रवेश करणारा राहू, हा चंद्राला बारावा राहणार असून त्यांची मानसिक व्यग्रता कमालीची वाढवणारा आहे. 2024 च्या निवडणुकीत काही महत्त्वाच्या खेळी त्यांना नेपच्यून-प्लुटो यांच्या लाभ योगात राहु ला हाताशी घेऊन खेळाव्या लागणार असून, त्यात ते चांगलेच यशस्वी होणार आहेत. प्रकृतीकडे मात्र त्यांना जास्तीचे लक्ष द्यावे लागणार आहे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने, हृदयविकारा सारख्या आजारांकडे सर्वप्रथम लक्ष द्यावे लागणार आहे.
5) भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा (J.P Nadda Kundali)
यांच्या कुंडलीत मीन राशीत आलेला राहू त्यांना फारसा उपयुक्त नसून, कुंभ राशीत आलेला शनी हा रवि, चंद्र, राहूच्या अशुभ योगातून जाणार आहे. मीन राशितील राहू हा शनी-मंगळाच्या अशुभ योगातून जाणार असल्याने, तिकीट वाटप करताना मेजर चुका घडणार आहे.
6) नितीन गडकरी (Nitin Gadkari Kundali)
त्यांच्या कुंडलीत येणारा राहू हा राशीला बारावा येत असल्याने व त्यांच्या कुंडलीतील मूळच्या राहुला सहावा येत असल्याने संमिश्र फलदायी होणार आहे ह्या गोचर राहू मूळे त्यांची राजकीय महत्वकांक्षा सफल होणार नाही. 2024 मध्ये प्रकृतीचे वाढते त्रास त्यांना सहन करावे लागणार आहेत.
7) नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री (Nitish Kumar Kundali)
यांना मीन राशीतील राहू भ्रमण, त्यांच्या जन्मस्थ कुंडलीतील राहुला बारावे राहणार आहे, तसेच कुंभ राशीतील शनी भ्रमण त्यांच्या मूळ कुंडलीतील रवी-गुरू-राहू-बुध या ग्रहांवरून सुरू असून फसगत आणि फसवणुकीचे योग सुरू आहेत. २६ पक्षांचा एकत्रित पण मनाने विखूरलेल्या पक्षात सर्वांना फसवण्याचा दृष्टिकोनामुळे, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत स्वपक्षातील सहकाऱ्यांच्या असहकारामुळे निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत गोचऱ् मीन राशीतील राहू भ्रमणामुळे सर्वत्र फसगत झालेली असल्याचे नंतर निदर्शनास येईल. २६ पक्षांचे एकत्रीकरण करून सुरू केलेल्या या खेळात त्यांना दारुण निराशा पदरी पडलेली दिसणार आहे.
8) तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K.C. Rao Kundali)
यांच्या कुंडलीत दशम स्थानात येणाऱ्या मीनेच्या राहू मुळे महाराष्ट्रात हातपाय पसरण्याचे मनसुबे धुळीला मिळतील. कुंभ राशितील शनी हा नोव्हेंबर 4 पासून मार्गी होऊन त्यांच्या कुंडलीतील रवी-बुध-शुकावरून भ्रमण करणारा असून, मंगळाच्या अशुभ योगातून जात असल्याने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा तेलंगणात दारुण पराभव होऊ शकतो. गेल्या वेळी जिंकलेल्या 11 जागा देखील त्यांना यावेळी राखता येणार नाहीत.
9) ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री (Mamata Banerjee Kundali)
यांच्या कुंडलीत मीन राशीत नोव्हेंबरच्या शेवटास येणाऱ्या राहू त्यांच्या मूळ कुंडलीतील रवी-बुध-राहू ह्यांच्या अशुभ योगातून जाणार असल्याने, 2024 च्या निवडणुकीत त्यांना अपयशाला सामोरे जावे लागणार आहे. कुंभ राशीतील शनी दिनांक 4 नोव्हेंबरला मार्गी होत असल्याने, त्यांच्या चंद्राच्या अशुभ योगातून जात असल्याने, प्रकृती संदर्भातील वाढत्या तक्रारी त्यांना हैराण करणार आहेत. निवडणुकीत त्यांच्या पक्षाला अपयशाचा सामना करावा लागेल आणि त्यांची राजकीय महत्त्वकांक्षा धुळीला मिळणार आहे.
10) अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री (Arvind Kejariwal Kundali)
अरविंद केजरीवाल यांच्या कुंडलीत मीन राशीत येणारा राहू त्यांच्या कुंडलीतील शनि-राहू वरून त्याचं भ्रमण होणार असून, त्यांच्या सत्ताकांक्षेला जबरदस्त हादरा बसणार आहे. केजरीवाल यांची साडेसाती सुरू असून, दिनांक 4 नोव्हेंबर पासून गोचर शनीचे चंद्रावरून भ्रमण होत असल्याने प्रकृती अस्वस्थता खूप राहील. त्यांना दिल्लीच्या जागा निवडून आणण्यासाठी प्रचंड संघर्ष करून सुद्धा खूप मोठं अपयश बघावे लागणार आहे.
२०२४ च्या निवडणुकीत एकंदर ७५ पक्ष संभाव्य लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून, भारताच्या दुभंगलेल्या या जनमता मुळे भाजपाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार असून, अनेक पक्षांचे त्यांना सहकार्य घ्यावे लागणार असल्याने, ही निवडणूक प्रचंड चुरशीची मात्र नक्कीच होणार आहे.