Shukra Gochar 2023: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. याचा प्रभाव सर्व राशींवर शुभ अशुभ स्वरूपात दिसून येऊ शकतो. काही राशींवर असणाऱ्या ग्रहांच्या स्वामित्वानुसार त्यांना नेमका कसा प्रभाव जाणवू शकतो याचे स्वरूप बदलू शकते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, उद्या म्हणजेच ३० मे २०२३ ला वैभव, संपत्ती व प्रेम यांचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह हा कर्क राशीत प्रवेश घेण्यासाठी सज्ज झाला आहे. या ठिकाणी शुक्रदेव पुढील दीड महिना म्हणजेच ६ जुलैपर्यंत कायम असणार आहे. तिथून मग पुढे शुक्र सिंह राशीत प्रवेश घेणार आहे. कर्क राशीतील प्रभावामुळे तीन राशींना येत्या काळात अमाप धनसंपत्ती मिळण्याचे योग आहेत. या राशी नेमक्या कोणत्या व त्यांना कसा लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया…

कर्क राशीतील शुक्र ‘या’ राशींच्या नशिबाला देईल कलाटणी?

मेष रास (Aries Zodiac)

ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या मंडळींना शुक्राचे गोचर अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकते. शुक्र देव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत चौथ्या स्थानी कायम असणार आहेत. हे स्थान भूमी, भवन व वाहन यांचे स्थान मानले जाते. यामुळे ६ जुलै पर्यंत आपल्या कुंडलीत या तिन्ही गोष्टींच्या खरेदीचे योग आहेत. आपल्याला संतती सुख लाभण्यातील अडथळे दूर होऊ शकतात. याकाळात अनोळखी लोकांशी फार उत्तम संबंध जुळण्याची शक्यता आहे पण डोळे झाकून विश्वास टाकू नका.

Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
rahu shukra yuti 2025 in marathi astrology
Rahu Shukra Yuti 2025: २०२५ वर्ष ‘या’ तीन राशींसाठी सुखाचं! राहू-शुक्राच्या संयोगाने मिळणार प्रचंड पैसा, आनंद अन् मान सन्मान

मिथुन रास (Gemini Zodiac)

३० मे ला शुक्र कर्क राशीत गोचर करताच मिथुन राशीच्या गोचर कुंडलीत दुसर्या स्थानी येणार हं. हे स्थान धन व स्वभावाचे स्थान मानले जाते. शुक्राच्या गोचरासह आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता आहे पण याचसह आपल्याला स्थलांतरित होण्याची संधी मिळू शकते. आपल्या आर्थिक मिळकतीत वाढ होऊ शकते. आपल्या कुंडलीत संसार सुख दिसून येत आहे. ६ जुलैपर्यंतचा कालावधी एखाद्या धार्मिक कार्यासाठी शुभ ठरू शकतो. अशातच शनीसुद्धा आपल्याला लाभदायक ठरत असल्याने सुख व समृद्धी अनुभवता येऊ शकते.

हे ही वाचा<< १८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश? ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन

मीन रास (Pisces Zodiac)

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह आपल्या राशीच्या गोचर कुंडली पाचव्या स्थानी भ्रमण करत आहेत. हे स्थान संगतीत, बुद्धी, विवेक व रोमान्सचे स्थान म्हणून ओळखले जाते. साहजिकच यानुसार शुक्रदेवाची कृपा सुखांशी गाठ घालून देऊ शकते. तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्याचे बळ मिळू शकते पण यावेळी स्वतःचे मूळ विसरण्याची चूक करू नका. प्रेमाची नाती आणखी गोड होऊ शकतात, धार्मिक कार्यातील आवड वाढण्याची शक्यता आहे. तुमचे डोके थंड व वाणी निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न करा.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader