Loksabha Elections Astrologer Predictions: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. २०६ सभा, रोड शो, ८० हून अधिक मुलाखती व ‘अबकी बार ४०० पार’च्या घोषणांसह प्रचाराचं झंझावाती वादळ मोदींनी देशभरात पोहोचवलं होतं. तर दुसरीकडे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. ज्योतिषतज्ज्ञ उदयराज साने यांनी म्हटल्याप्रमाणे, दोन्ही पक्षांकडून लोकसभेच्या रणधुमाळीत आपल्याकडील सर्वोत्तम आयुधे वापरण्यात आली असली तरी विविध प्रश्नांना भिडणारी कार्यप्रणाली भाजपा शिवाय इतर राजकीय पक्षांकडे नसल्याने, या निवडणुकीला प्रचंड महत्त्व आले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने ३५० खासदारांचे लक्ष ठेवले असले तरी त्याला कितपत यश येणार काळच ठरवेल अशी भविष्यवाणी साने यांनी जानेवारी २०२३ मध्येच केली होती. तर आता मूळ लोकसभा निकालाच्या दिवशी देशभरात व विशेषतः महाराष्ट्रात जागांची समीकरणे कशी जुळून येतील याविषयी सुद्धा ज्योतिषतज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निकालाची देशातील समीकरणे

उदयराज साने यांनी केंद्रात २०२४ भाजपा व मित्र पक्षांचा विजय होण्याच्या बहुचर्चित शक्यतेला समर्थन दर्शवलं आहे. देशभरात मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा व मित्र पक्षांना तब्बल ३६० ते ३८६ जागांवर विजय मिळवता येऊ शकतो. तर काँग्रेसला साधारण ६० ते ७० जागी विजय प्राप्त होण्याची शक्यता आहे. अन्य प्रादेशिक पक्ष ९० ते १०० जागी विजयी होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निकालाची महाराष्ट्रातील समीकरणे

ज्योतिषतज्ज्ञांनी महाराष्ट्रातील ४८ जागांच्या निवडणूक निकालासाठी सुद्धा काही भाकिते वर्तवली आहेत. महाराष्ट्रात भाजपाला एक हाती सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता सध्या दिसत आहे. साने सांगतात की, भाजपाला १८ ते २० ठिकाणी विजय प्राप्त करता येईल तर शिवसेना (शिंदे गटाला) १२ जागा जिंकता येतील. राष्ट्रवादीतून बंड करून निघालेल्या अजित पवार गटाला ३ जागी विजय मिळवता येऊ शकतो तर मागे उरलेल्या शरद पवार गटाला सुद्धा तितक्याच जागा जिंकता येऊ शकतील. उद्धव ठाकरे गट व काँग्रेसला एकत्रित साधारण १० जागा आपल्या नावे करता येऊ शकतात.

हे ही वाचा<<४५ तास ध्यान करताना नरेंद्र मोदींनी काय अनुभवलं? पंतप्रधानांनी स्वहस्ते लिहिलेलं पत्र वाचा, म्हणाले, “माझ्या शरीराचा प्रत्येक कण..”

दरम्यान, मतमोजणीच्या पहिल्या व दुसऱ्या फेरीनंतर एनडीए ३०० जागी विजयी होताना दिसत आहे तर इंडियाला आघाडी सुद्धा २३० जागांवर विजयी होताना दिसत आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीत मुळात एनडीए व इंडियाच्या विजयी जागांमध्ये मोठी तफावत दिसत होती पण मूळ निकालात हा फरक कमी होताना दिसत आहे. संपूर्ण निकालाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या मुख्य पृष्ठाला नक्की भेट द्या.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp maharashtra to win 20 plus loksabha seats uddhav thackeray sharad pawar astrology predictions jyotish experts on ls election results svs
Show comments