ज्योतिष शास्त्रामध्ये एकूण १२ राशींचा उल्लेख करण्यात आला आहे आणि प्रत्येक राशीमध्ये काही ना काही खास असते. जे त्या राशीच्या लोकांना बाकी राशींपेक्षा खास बनवते. आज आपण अशाच काही राशीच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्याकडे अप्रतिम सिक्स्थ सेन्स पॉवर असते. ते कोणाच्याही मनातलं लगेच ओळखू शकतात. सहाव्या इंद्रिय शक्तीमुळे हे लोक जीवनात कधीही पराभूत होत नाहीत. ते भविष्यातील घटनांचा आधीच अंदाज घेतात.
धनु (Sagittarius) : या राशीचे लोक अतिशय कुशाग्र मनाचे असतात. ते आपल्या बुद्धिमत्तेने सर्वांना मागे सोडतात. त्यांची सहाव्या इंद्रियांची शक्ती खूप वेगवान असते. भविष्यात घडणाऱ्या गोष्टी त्यांना आधीच माहीत असतात. कुणाच्या मनात काय चालले आहे याची अचूक माहितीही त्यांना मिळते. यांचा देव गुरु बृहस्पति यांची त्यांच्यावर विशेष कृपा आहे.
मीन (Pisces) : देव गुरु बृहस्पति या राशीच्या लोकांवर विशेष दयाळू असतात. ते अतिशय बुद्धिमान आहेत. त्यांच्या सहाव्या इंद्रिय शक्तीने ते समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे ते शोधून काढतात. एवढेच नाही तर भविष्यात कोणत्याही कामात यश मिळेल की नाही याची त्यांना आधीच योग्य कल्पना असते. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही कामात अपयश येण्याची शक्यता कमी असते.
आणखी वाचा : बॉलिवूड अभिनेत्रींचे स्टायलिश मंगळसूत्र पाहिलेत का?
वृश्चिक (Scorpio) : या राशीचे लोक मेहनती आणि बुद्धिमान असतात. कोण खोटं बोलतं असेल तर त्यांना लगेच कळते. त्यांची फसवणूक करता येत नाही. जीवनातील समस्यांवर ते लगेच उपाय शोधतात. भविष्यातील घडामोडींचीही त्यांना त्वरित माहिती मिळते. त्यांच्यामध्ये दैवी शक्ती आहेत.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)