Shukra Gochar 2022: वैदिक शास्त्रांमध्ये शुक्र ग्रह हा प्रेम, भौतिक सुख, सुखसोयी, ऐश्वर्य, वैभव आणि संपत्ती इत्यादींचा कारक मानला जातो. ज्योतिषाच्या गणनेनुसार, ७ ऑगस्ट रोजी सकाळी ०५:२० वाजता शुक्र वृषभ राशी सोडून कर्क राशीत प्रवेश करत आहे. ३१ ऑगस्टपर्यंत शुक्र या राशीत राहील. यानंतर ते सिंह राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या राशी बदलामुळे काही राशींना फायदा होईल, तर काही राशीच्या लोकांनी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या शुक्राच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना फायदा होईल.
या राशींना शुक्राच्या संक्रमणामुळे लाभ होईल
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण लाभदायक ठरेल. करिअरला नवीन उड्डाण मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. याच्या आधारे तुम्हाला प्रमोशनही मिळू शकते. पण वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे समंजसपणे वागणे कधीही हिताचे ठरेल.
वृषभ
शुक्राचे संक्रमणही वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणेल. या राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळेल. त्यामुळे व्यवसाय करणाऱ्यांना दुप्पट नफा मिळेल. वैवाहिक जीवनात सुख मिळणार आहे. कुटुंबामध्ये देखील आधीपासून चालत असलेले वाद या काळात संपुष्टात येतील.
( हे ही वाचा: बुध २० दिवस सिंह राशीत राहील; या काळात ‘या’ चार राशींना त्यांच्या करिअरमध्ये पूर्ण लाभ मिळेल)
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना शुक्राच्या राशीत बदलाचा फायदा होईल. कारण या राशीतूनच शुक्र कर्क राशीत प्रवेश करत आहे. अशा स्थितीत या राशीत शुभ परिणामही येतील. वैवाहिक जीवनात आनंद राहील. जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.
कन्या
कन्या राशीच्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात खूप आनंद येणार आहे. पती-पत्नीच्या नात्यात प्रेम वाढेल. तब्येतीची थोडी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या महिन्यात एखादं वाहन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे.
( हे ही वाचा: Mangal Gochar 2022: १० ऑगस्टपासून या राशींचे चमकेल भाग्य; मंगळाच्या कृपेने होईल धनलाभ)
तूळ
तूळ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामाची प्रशंसा होईल. ज्येष्ठांच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. पण कौटुंबिक जीवनात थोडा संघर्ष होईल. आरोग्याबाबत अजिबात निष्काळजी राहू नका. तसंच कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कामाची प्रशंशा होण्याची शक्यता आहे.