Budh Nakshatra Parivartan 2025: नवग्रहांचा राजकुमार बुध ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला एक महिना लागतो. नवग्रहांमध्ये बुधाचे संक्रमण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बुध हा बुद्धिमत्ता, शिक्षण, ज्ञान, बुद्धी, वाणी, प्रतिभा इत्यादींचा कारक ग्रह आहे. बुध ग्रहाच्या कृपेने एखाद्या व्यक्तीमध्ये अनेक उत्कृष्ट कौशल्ये निर्माण होतात. त्यामुळे व्यक्तीला जीवनाच्या अनेक क्षेत्रांत यश मिळविण्यात मदत होते, असे मानतात. वैदिक पंचांगानुसार गुरुवार, ११ एप्रिल रोजी वाणी व बुद्धिमत्ता यांचा कारक ग्रह बुध शनी देवाच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करील. बुधाच्या नक्षत्रबदलामुळे काही राशींच्या लोकांचे नशीब उजळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊ या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.
‘या’ तीन राशींचे लोक बक्कळ पैशांमुळे होणार श्रीमंत
वृषभ
बुध देवाच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीमध्ये भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना मोठा फायदा होऊ शकतो. दीर्घकाळ प्रलंबित कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. जमीन किंवा मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. खिसा सतत पैशाने भरलेला राहू शकतो. एवढंच काय तर या राशीच्या लोकांचा अडकलेला पैसाही परत मिळू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. यावेळी तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये विजय मिळू शकतो.
सिंह
बुध देवाच्या कृपेने तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. पैशाची आवक वाढू शकते. या काळात आर्थिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. मान-सन्मानात वाढ होऊ शकते. तुम्हाला मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफादेखील मिळू शकतो. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकणार आहे. शेअर बाजाराशी संबंधित गोष्टींमध्ये यश मिळू शकते. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो.
धनू
बुध देवाच्या कृपेने धनू राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला भागीदारीत यश मिळू शकते. व्यवसायात अपार यश मिळून तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात या राशीच्या लोकांच्या भौतिक सुखसोईंमध्ये वाढ होऊ शकते. प्रलंबित असलेली कामे पुन्हा मार्गी लागू शकतात. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)