Buddha Purnima 2023 Zodiac Sign: दरवर्षी वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. शास्त्रानुसार याच दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता असे मानले जाते. असं म्हणतात, गौतम बुद्ध यांच्या जीवनात तीन घटना अगदी महत्त्वाच्या होत्या त्या म्हणजे त्यांचा जन्म, ज्ञान व मोक्ष. योगायोगाने हे तिन्ही दिवस एकाच तिथीवर आले होते. यावर्षी ५ मे २०२३ ला जगभरातील बुद्ध धर्माचे अनुयायी मोठा सण साजरा करणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार यंदाच्या बुद्ध पौर्णिमेला अत्यंत शुभ असा राजयोग जुळून आला आहे. हा दुर्मिळ राजयोग तब्बल १३० वर्षांनी जुळल्याने काही राशींना बक्कळ धनलाभ व श्रीमंती लाभण्याची चिन्हे आहेत. या राजयोगाने नेमक्या कोणत्या राशीला कसा लाभ होणार आहे हे पाहूया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुद्ध पौर्णिमेला ‘या’ राशींना होणार बंपर लाभ?

मेष रास (Mesh Rashi)

ज्योतिष शास्त्रानुसार १४ एप्रिलला सूर्य गोचर करून मेष राशीत प्रवेश करणार आहेत तसेच मेष राशीत सूर्याची बुध ग्रहासह युती होणार आहे, मेष राशी मध्ये या काळात बुधादित्य राजयोग तयार होत असल्याने याचा शुभ प्रभाव मेष राशीला अनुभवता येणार आहे. या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. नोकरीमध्ये मोठा व मनाला हवा तसा बदल होण्याची शक्यता आहे.

कर्क रास (Karka Rashi)

सूर्य व बुध राशीच्या युतीने बुधादित्य राजयोग बनल्याने कर्क राशीच्या मंडळींच्या नशिबाला झळाळी मिळण्याची शक्यता आहे. या याकाळात तुम्हाला करिअरमध्ये वेग अनुभवता येऊ शकतो. तुम्हाला नोकरीच्या निमित्ताने वास्तव्याचे स्थान बदलण्याची संधी आहे. एवढंच नाही तर या राशीच्या भाग्योदयाचे सुद्धा योग आहेत.

सिंह रास (Sinha Rashi)

ज्योतिष शास्त्रानुसार, बुधादित्य राजयोग सिंह राशीला अनुकूल सिद्ध होऊ शकतो. करिअरमध्ये नवीन संधी चालून आल्याने तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा अनुभवता येऊ शकते. या काळात तुमचे अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. सूर्य गोचर या राशीच्या आयुष्यात आनंद घेऊन येऊ शकते. प्रमोशनचे सुद्धा योग आहेत. पगारवाढ झाल्यास तुमच्या आयुष्यात राजेशाही थाट अनुभवण्याची संधी मिळू शकते.

हे ही वाचा<< शनीचा ‘त्रि-एकादशी’ योग ‘या’ राशींना बनवेल कोट्याधीश? सूर्यग्रहणानंतर ‘या’ रूपात मिळू शकते चौपट श्रीमंती

बुद्ध पौर्णिमा ज्योतिषीय राजयोग

ज्योतिषशास्त्रानुसार वैशाख पौर्णिमेला म्हणेजच बुद्ध पौर्णिमेला चंद्र ग्रहण लागणार आहे. रात्री ८ वाजून ४५ मिनिटांपासून ते मध्य रात्री १ वाजेपर्यंत चंद्र ग्रहणाचा प्रभाव कायम असणार आहे. यादिवशी सूर्योदयापासून ते साक्ली ९ वाजून १७ मिनिटांपर्यंत सिद्धी योग कायम असणार आहे. या दिवशी स्वाती नक्षत्र राशिचक्रावर प्रभावी असल्याने हा काळ शुभ असू शकतो. शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी असा योग १३० वर्षांनी जुळून आला आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buddha purnima 2023 after 130 years budh graha and siddhi yog created these zodiac signs to be wealthy huge money svs
Show comments