Dhan Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक कालावधीनंतर ग्रह आपली स्थिती बदलत असतात. राशीचक्रातील बारा राशीत भ्रमण करत असताना वक्री, अस्त-उदय अशी स्थिती पाहायला मिळते. त्या त्या परिस्थितीचा राशीचक्रावर परिणाम होत असतो. प्रत्येक ग्रहाच्या गोचरचा सर्व राशीच्या लोकांवर चांगला आणि वाईट प्रभाव पडत असतो. १८ सप्टेंबरपासून बुध आणि शनि एकमेकांच्या सातव्या राशीतून भ्रमण करतील. ज्यामुळे ‘धन राजयोग’ तयार होणार आहे. ज्याचा सकारात्मक प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. बुध-शनीची ही स्थिती काही राशींसाठी शुभ व फलदायी ठरु शकते. चला जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांचे उजळू शकतात नशीब…
‘या’ राशीच्या लोकांचे उजळणार नशीब?
मेष राशी
बुध आणि शनिदेवाच्या कृपेने मेष राशीतील मंडळींना चांगले दिवस अनुभवायला मिळू शकतात. या दरम्यान या राशीच्या लोकांना नवीन आणि उत्कृष्ट नोकरीच्या संधी मिळू शकतात. या काळात आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. जे विद्यार्थी परदेशात अभ्यासासाठी जाण्याचा विचार करत आहेत, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. जे नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत, त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात.
(हे ही वाचा : चंद्राच्या स्वामी राशीत शुक्रदेव मार्गी! पुढील तीन महिने ‘या’ राशींना बनवतील कोट्याधीश? घरात नांदू शकते सुख-समृध्दी )
वृषभ राशी
वृषभ राशीतील मंडळीसाठी हा काळ शुभ सिद्ध होऊ शकते. यावेळी तुमचे नशीब तुमच्या सोबत असू शकते. घरात कोणताही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतो. यासोबतच धर्माच्या कार्यात तुमची रुची वाढू शकते. तुम्हाला नोकरी-व्यवसायात चांगले यश मिळू शकते. यासोबतच उत्पन्नातही वाढ होऊ शकते. यासोबतच आरोग्यातही सुधारणा होऊ शकते.
तूळ राशी
तूळ राशीतील लोकांना या काळात चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतात. उत्पन्नात वाढ आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्हाला सर्व कामांमध्ये यश मिळू शकेल. या काळात रखडलेला पैसाही मिळू शकेल. यावेळी पैशावर नियंत्रण ठेवून बचत करणे शक्य होऊ शकते. तसेच या काळातील तुमच्या अनेक योजना यशस्वी होऊ शकतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)