Budh Shukra Rashi Parivartan Impact: प्रत्येक ग्रहाचा भ्रमंती काळ वेगवेगळा असतो. त्याला ग्रह गोचर म्हणतात. एखाद्या राशीत एकापेक्षा जास्त ग्रह येतात. त्यामुळे काही शुभ-अशुभ योग तयार होतात. ज्योतिष्यशास्त्रांत, ग्रह आणि गोचर यावरून भाकीतं केली जातात. त्यामुळे ज्योतिष्यांच्या मते ग्रहांचा गोचर महत्त्वाचा ठरतो. आता येत्या ७ मार्च रोजी तब्बल शंभर वर्षांनी दोन ग्रहांचा गोचर एकाच दिवशी होणार आहे. बुधदेव सात मार्चला मीन राशीत प्रवेश करणार आहेत, तर शुक्रदेव कुंभ राशीत गोचर करणार आहेत. ज्यामुळे काही राशींना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात.
‘या’ राशींना होणार धनलाभ?
वृषभ राशी
दोन ग्रहांचे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी अच्छे दिन घेऊन येणारे ठरु शकते. व्यवसायात भरपूर फायदा होऊ शकतो. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. या महिन्यात तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यामुळे तुम्ही बचतही करू शकता.
(हे ही वाचा : येत्या दोन महिन्यात माता लक्ष्मी ‘या’ ५ राशींना देणार अपार धन? ‘गजलक्ष्मी राजयोग’ बनल्याने गडगंज श्रीमंती कोणाच्या नशिबात? )
मकर राशी
मकर राशीच्या लोकांसाठी दोन ग्रहांचे गोचर फायदेशीर ठरु शकते. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. या कालावधीत वाहन किंवा जमीन खरेदीचा योग जुळून येऊ शकतं. कर्जाचा बोजाही हलका होऊन कौटुंबिक वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ राशी
दोन ग्रहांचे गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. या काळात अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येऊ शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराची चांगली साथ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना काही चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)