Lakshmi Narayan Yog: ज्योतिषशास्त्रात नवग्रहाच्या राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व असते. हे ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करतात. ज्याचा १२ राशींच्या जीवनावर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडतो. अशातच  आता येत्या नवीन वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये शुक्रदेव आणि बुधदेवाची युती होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही युती मकर राशीत होणार आहे. ज्यामुळे ‘लक्ष्मी नारायण योग’ तयार होत आहे. हा योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरु शकतो. संपत्ती आणि प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२४ मध्ये ‘या’ राशींचे भाग्य चमकेल?

मेष राशी

लक्ष्मी नारायण योग मेष राशीतील लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. नवीन वर्षांत रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. कामात मोठे यश मिळू शकते. नोकरीत पद वाढू शकते. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षांत आर्थिक स्थिती पूर्वी पेक्षा चांगली होऊ शकते. या राशीतील लोकांना मनासारखा जोडीदार लवकरच मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : १ हजार वर्षांनी बनतोय ‘शुभयोग; २०२४ मध्ये ‘या’ ३ राशींवर शनिदेवाची कृपा? गुरू ग्रह देऊ शकतात श्रीमंत बनण्याची संधी )

तूळ राशी

बुध आणि शुक्रदेवाच्या कृपेने तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. नवीन वर्षात उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. प्रलंबित कामे पुन्हा सुरू करता येऊ शकतात. या काळात आर्थिक समस्यांपासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये कोणतीही मोठी उपलब्धी मिळू शकते. नोकरी व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता आहे. पगारात वाढ होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढू शकतो.

धनु राशी

लक्ष्मी नारायण योग बनल्याने धनु राशीच्या लोकांच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात वाढ होऊन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. तुम्हाला करिअरशी संबंधित उत्कृष्ट संधी मिळू शकतात. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. यावेळी तुम्ही कोणतेही वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता. नवीन वर्षात तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे) 

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budh and shukra will make lakshmi narayan yog 2024 these three zodiac signs bank balance to raise money pdb