Budh Ast In Meen Rashi: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाच्या राशी परिवर्तनाला आणि नक्षत्र परिवर्तनाला खूप खास मानले जाते. हा परिवर्तनाचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला वाणी, व्यापार आणि बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. बुधदेखील इतर ग्रहांप्रमाणे राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन किंवा अस्त, उदित अवस्थेत प्रवेश करतो. ज्याचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. पंचांगानुसार, १७ मार्च २०२५ रोजी बुध ग्रह मीन राशीत अस्त होणार असून येणारे २० दिवस याच अवस्थेत राहिल. यादरम्यान काही राशींच्या व्यक्तींना आर्थिक अडचणी, तणावाचा सामना करावा लागू शकतो.
या तीन राशीच्या व्यक्तींनी घ्या विशेष काळजी
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाची अस्त अवस्था फारशी अनुकूल सिद्ध होणार नाही. या काळात शत्रूंपासून सावध राहा आणि मनातील गोष्टी इतरांना सांगण्याआधी विचार करा. तणाव, वादविवादाचा सामना करावा लागले. आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वायफळ खर्च करू नका. तसेच कुठेही गुंतवणूक करण्यापासून दूर रहा. कामाच्या ठिकाणी विणाकारण वाद घालू नका. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. या काळात धार्मिक कार्यात मन रमेल.
कन्या
बुध ग्रहाची अस्थ अवस्था कन्या राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरणार नाही. हा काळ तुमच्यासाठी अनेक अडचणी निर्माण करणारा असेल. तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, वाणीवर नियंत्रण ठेवा. आव्हानांना सामोरे जाल. या काळात कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना सांभाळून चालवा. तसेच या काळाता कुटुंबात कोणतेही वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर वाद होऊ शकतात. त्यामुळे या काळात सांभाळून राहा.
वृश्चिक
बुधाची अस्त अवस्था वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी तितके लाभदायी सिद्ध होणार नाही. या काळात तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये दूरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबातील वरिष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. आयुष्यात अडचणी निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी मन लागणार नाही त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर नाराज असतील. तणावाचा सामना करावा लागेल. तसेच व्यर्थ पैसे खर्च होतील. त्यामुळे या काळात शांत राहून प्रत्येक निर्णय घ्या, कोणत्याही कामाच घाई करू नका.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)