ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा ग्रह राशी बदलतो किंवा उदय तेव्हा त्याचा परिणाम थेट मानवी जीवनावर होतो. कुंडलीतील महादशा अंतर्दशा आणि ग्रहाचं स्थान यावर ठराविक कालावधीनंतर होणारे गोचर प्रभाव टाकत असतात. बुद्धी आणि व्यवसायाचा कारक असलेला बुध ग्रह ६ मार्च रोजी कुंभ राशीत प्रवेश केला आहे. वैदिक ज्योतिषात बुध ग्रह बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी आणि मित्राशी संबंधित आहे. बुधाच्या या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर असेल, पण अशा चार राशी आहेत, त्यांना विशेष फायदा होईल.
मेष: तुमच्या राशीच्या अकराव्या स्थानात बुध ग्रहाचे भ्रमण सुरु आहे. या स्थानाला उत्पन्नाचे स्थान म्हणतात. या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. तसेच उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. बुध ग्रह तुमच्या राशीच्या तिसऱ्या आणि सहाव्या स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुमची शक्ती वाढेल. तसेच, तुमच्या भावंडांसोबतचे नातेसंबंध चांगले राहतील. सहाव्या घराचा स्वामी असल्याने गुप्त शत्रूंचा नाश होईल. तसेच जुन्या आजारापासून मुक्ती मिळेल.
वृषभ: बुधाचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या कुंडलीत बुध ग्रह दशम भावात गोचर करत आहे. या स्थानाला नोकरी आणि कार्यक्षेत्राचं स्थान म्हणतात. काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच जिथे नोकरी करत असाल तिथे बढती मिळू शकते. यावेळी तुम्ही नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता. दुसरीकडे, बुध तुमच्या दुसऱ्या आणि पाचव्या स्थानाचा स्वामी आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो किंवा तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते या काळात मिळू शकतात.
मिथुन: तुमच्या राशीत बुध ग्रह नवव्या भावात भ्रमण करेल. या स्थानाला भाग्याचे घर आणि परदेश प्रवासासंदर्भात माहिती मिळते. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळेल. दुसरीकडे, जे शेअर बाजाराशी संबंधित आहेत, ते चांगले पैसे कमवू शकतात. व्यवसायात नवीन डील फायनल होऊ शकते. या काळात तुम्ही व्यवसायाशी संबंधित प्रवास देखील करू शकता, जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल.
Holi 2022: हिंदू शास्त्रात होळी भस्मला विशेष महत्त्व, जाणून घ्या
मकर: तुमच्या राशीच्या राशीत बुध द्वितीय स्थानात आहे. या स्थानाला धन आणि वाणीचे स्थान म्हटले जाते.या काळात तुम्ही व्यवसायात चांगली कमाई करू शकता. बुध तुमच्या सहाव्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाचीही साथ मिळेल. तुम्ही जे काही काम हातात घ्याल, तिथे तुम्हाला यश मिळेल.या काळात व्यावसायिक प्रवासही करू शकता. जर तुमचा व्यवसाय पेट्रोल, तेल, लोखंड आणि कोळशाशी संबंधित असेल तर तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतो.