Budh Rashi Parivatan 2023: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह बुद्धिमत्ता, वाणी, सौंदर्य आणि धनाचा कारक मानला जातो. जीवनातील यशामागे बुध ग्रहाचे विशेष योगदान मानले गेले आहे. कारण बुध ग्रहाचा संबंध बुद्धिमत्ता, वाणी आणि व्यापाराशी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रहांमध्ये बुध हा सर्वात सुंदर आणि कोमल ग्रह आहे. बुधाचा थेट संबंध तुमची त्वचा आणि सौंदर्याशी आहे. बुध ग्रह बुद्धि आणि शिक्षणाचा कारक ग्रह आहे. त्यामुळे बुध ग्रहाची स्थिती खूपच महत्त्वाची ठरते.
बुध ग्रहाचं एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करताच बऱ्याच घडामोडी घडतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा बुध दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रभाव दिसून येतात. आता १ ऑक्टोबर २०२३ रोजी बुधदेव कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. बुधाच्या राशी परिवर्तनाचा मोठा प्रभाव १२ राशींवर पडणार आहे. पण त्यातील तीन राशी अशा आहेत, ज्यांच्यावर बुधदेवाच्या संक्रमणाचा विशेष प्रभाव पडू शकतो. त्यांचे भाग्य चमकू शकतात. १ ऑक्टोबर २०२३ पासून या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार?
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण खूप फायदेशीर ठरु शकते. या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकतो. उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात.
(हे ही वाचा : गजलक्ष्मी राजयोगामुळे कर्कसह ‘या’ राशींना २ ऑक्टोबरपर्यंत होणार बक्कळ धनलाभ? लक्ष्मीची पावलं उमटू शकतात दारी)
कन्या
बुधाचा राशी बदल कन्या राशीच्या मंडळीसाठी लाभदायक ठरु शकते. या लोकांना बुध ग्रहाच्या कृपेने धनाची प्राप्ती होऊ शकते. नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. नवीन संधी मिळू शकतात. या काळात तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण प्रगतीचा योग घेऊन येणारा ठरु शकतो. धर्म-कार्यात रुची वाढू शकते. या राशीतील तरुणांचे परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. या काळात विरोधकांवर विजय मिळवू शकता आणि कोणत्याही अडथळ्यावर यशस्वीपणे मात करु शकता.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)