Budh Gochar in Aries : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध हा चंद्रानंतर सर्वांत जलद मार्गक्रमण करणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे ग्रहांचा राजकुमार बुध एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी एका महिन्यापेक्षा कमी वेळ घेतो. १० मे रोजी बुध मेष राशीत प्रवेश करणार आहे; ज्याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसेल. पण, तीन राशी अशा आहेत; ज्यांचे नशीब यावेळी बदलू शकते. तसेच करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. अशा या कोणत्या राशी आहेत; ज्यांना याचा फायदा होईल. ते जाणून घेऊ…

मिथुन

बुध राशीतील बदल मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. त्यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाच्या नवीन मार्गांमधून तुम्हाला पैसे मिळू शकतात. यातून पैसे मिळविण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. या काळात कार्यालयातील वरिष्ठांशी तुमचा समन्वय चांगला राहील. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. त्यामुळे तुमच्या आयुष्यात यशाच्या संधी येतील. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय तुम्हाला शेअर मार्केट, बेटिंग व लॉटरीमध्येही नफा मिळू शकतो.

budh uday 2025 today horoscope
Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश अन् जगाल आनंदी जीवन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Guru Margi 2025
Guru Margi 2025 : २४ तासानंतर पालटणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे नशीब; गुरुच्या सरळ चालीने संपत्तीत वाढ, नोकरी-व्यवसायात यश
Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान
Laxmi Narayan Yog 2025 budh shukra gochar
Laxmi Narayan Yog 2025 : १२ महिन्यांनंतर लक्ष्मीनारायण योगाने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसा व प्रेम; २७ फेब्रुवारीला जगण्याला मिळेल नवे वळण
Shani Gochar 2025
फेब्रुवारी महिन्यात शनि देव बदलणार चाल, ‘या’ तीन राशींचे धनी होणार! मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
february 2025 grah gochar budh surya mangal gochar
फेब्रुवारीमध्ये ‘या’ ४ राशींची होईल चांदीच चांदी! अचानक धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग

धनू

धनू राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा राशिबदल अनुकूल ठरू शकतो. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. म्हणजे मुलाचे लग्न होऊ शकते किंवा नोकरी मिळू शकते. या काळात कुटुंबातील सर्व सदस्यांशी तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल आणि प्रत्येक जण तुम्हाला आर्थिक मदत करील. तसेच यावेळी तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

कर्क

बुधाचा राशिबदल कर्क राशीसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभदायी ठरू शकतो. या राशिबदलामुळे करिअरची वाढ आणि चांगली बातमी मिळेल. तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. यावेळी बेरोजगारांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळतील. तसेच यावेळी तुम्ही व्यवसाय वाढवू शकता. नवीन ऑर्डर मिळाल्यास चांगला नफाही मिळू शकतो.

Story img Loader