Budh Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला वाणी, व्यापार आणि बुद्धीचा कारक ग्रह मानले जाते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत बुध शुभ स्थितीत आहे अशा व्यक्तींना आयुष्यात बुधाशी संबंधित सर्व गोष्टी प्राप्त होण्यास मदत होते. बुध ऑक्टोबरच्या सुरूवातीला कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे, शुक्राच्या या राशी परिवर्तनाने काही राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळेल.

पंचांगानुसार, बुध ग्रह १० ऑक्टोबर सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश करणार असून १९ दिवस या राशीत उपस्थित असेल. त्यानंतर बुध वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल.

बुधाचे राशी परिवर्तन तीन राशींसाठी फायदेशीर (Budh Gochar 2024)

मेष

मेष राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाचे तूळ राशीतील राशी परिवर्तन खूप लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या मानसन्मान वाढ होईल. अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. दूरचे प्रवास करणं फायदेशीर ठरेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. पार्टनरबरोबर चांगला वेळ घालवाल.

मिथुन

बुधाच्या राशी परिवर्तनाने मिथुन राशीच्या व्यक्तींना १९ दिवस विशेष लाभ होईल. या काळात मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. नोकरी, व्यवसायात हवी तशी प्रगती होईल. आनंदी आणि प्रसन्न राहाल. जोडीदारबरोबर अधिक घट्ट नाते निर्माण होईल.

हेही वाचा: शनी देणार बक्कळ पैसा; राहूच्या नक्षत्रात प्रवेश करताच ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार मानसन्मान, पैसा अन् प्रेम

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींनादेखील बुधाचे राशी परिवर्तन अत्यंत सकारात्मक फळ देणारे असेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. तुमच्या वाणीत गोडवा निर्माण होईल. या काळात तुम्हाला अधिक भौतिक सुख-सुविधा प्राप्त होतील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेटी द्याल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल, शक्य असल्यास या काळात ध्यानधारणा करा.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)